सध्या सर्वत्र टी-२० विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत नवनवे ट्वीस्ट येत आहेत. आता स्पर्धेत मोठा उलटफेर झाला असून नेदरलॅंड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे उपांत्य फेरीचे तिकीट पक्के झाले आहे. नेदरलॅंड दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केल्याने ‘ब’ गटातील संपूर्ण समीकरण बदलले आहे.
( हेही वाचा : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाखाली ट्रकचा अपघात! वाहतूक मंदावली, पोलिसांची ट्वीट करत माहिती)
भारतीय संघ उपांत्य फेरीत
गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धेत साऊथ आफ्रिका हा बलाढ्य संघ कधी पावसामुळे तर कधी ऐनवेळी खराब प्रदर्शन करून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यामुळे भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा आणि ब गटातून पहिला संघ ठरला आहे. गट अ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश झाला आहे.
नेदरलॅंडच्या विजयाने समीकरणे बदलली
नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्याने गट ब ची समीकरणे बदलली आहेत. भाकताने थेट उपांत्य फेरी गाठली असून दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश या दोघांपैकी एक संघ गट ब मधून भारतासमवेत उपांत्य फेरीत पोहोचेल.
Join Our WhatsApp Community