-
ऋजुता लुकतुके
गटवार साखळी सामने संपवून आता भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये (India in WI) सुपर ८ खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील ७ दिवसांतच भारतीय संघ सुपर ८ मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. गटवार साखळीत ए गटात अव्वल स्थान मिळवल्यानंतर भारतीय संघाला बार्बाडोसमध्ये ४ दिवसांची सुटी आहे. आणि त्यानंतर पहिला सामना संघ खेळेल तो २० तारखेला अफगाणिस्तानविरुद्ध. त्यामुळे भारतीय संघ सध्या निवांत आहे. संघासाठी दुपारच्या सत्रात नेट्स आयोजित करण्यात आले होते. पण, त्यापूर्वी खेळाडूंनी आनंद घेतला तो बार्बाडोसचा समुद्र आणि बीच व्हॉलीबॉलचा. (T20 World Cup)
बीसीसीआयनेच खेळाडूंचा हा व्हीडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि यात विराट कोहली, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत. (T20 World Cup)
(हेही वाचा – Lok Sabha Speaker पदी महिला नेत्या दिसणार ?; काय आहे भाजपची रणनिती…)
📍 Barbados
Unwinding at the beach 🌊, the #TeamIndia way! #T20WorldCup pic.twitter.com/4GGHh0tAqg
— BCCI (@BCCI) June 17, 2024
भारतीय संघाबरोबर असलेला राखीव खेळाडू खलिल अहमदही त्यांच्याबरोबर व्हॉलिबॉल खेळतोय. ‘आमच्या व्हॉलीबॉल संघात खूप चांगले खेळाडू आहेत. यशस्वी, रिंकू खूप छान खेळतात,’ असं खलिल या व्हीडिओत म्हणताना दिसतोय. (T20 World Cup)
भारतीय संघाने गटवार साखळीत आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव करत ए गटात निर्विवाद वर्चस्व राखलं. चौथा कॅनडाबरोबरचा सामना पावसात वाहून गेला. आता सुपर ८ मध्ये भारताच्या वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे, (T20 World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community