- ऋजुता लुकतुके
टी२० (T20 World Cup, Lockie Ferguson)क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. कुणी विचारही केला नसेल, असा विक्रम न्यूझीलंडच्या लॉकी फर्गुसनच्या (T20 World Cup, Lockie Ferguson) नावावर झाला. पापुआ न्यू गिनी संघाविरोधात लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकण्याचा पराक्रम केला आहे. लॉकी फर्गुसन यानं चार षटकं निर्धाव फेकत तीन बळीही मिळवले. टी२० (T20 World Cup, Lockie Ferguson) क्रिकेटमधील ही सर्वात भेदक गोलंदाजी म्हणून नोंद झाली आहे. कसोटी खेळणाऱ्या देशातील कोणत्याही गोलंदाजाला आतापर्यंत असा पराक्रम करता आलेला नाही, यापुढेही भविष्यात असा विक्रम होईल, याबाबत शंकाच आहे.
(हेही वाचा- City Civil Court Mumbai : जाणून घ्या मुंबईतील सिटी सिव्हिल कोर्टाचा इतिहास!)
टी२० विश्वचषकात (T20 World Cup, Lockie Ferguson) न्यूझीलंड (New Zealand) आणि पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) या संघाचं आव्हान संपुष्टात आलेय. त्यांच्यामध्ये आज अखेरचा साखळी सामना पार पडला. या सामन्यात गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने इतिहास रचला. फर्ग्युसनने ४ षटकांच्या स्पेलमध्ये एकही धाव खर्च न करता ३ बळी मिळवले. त्याने पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. लॉकी फर्ग्युसनच्या भेदक गोलंदाजीसमोर पापुआ न्यू गिनीचे फलंदाजांनी नांगी टाकली. (T20 World Cup, Lockie Ferguson)
LOCKIE FERGUSON vs PNG IN THE T20I WORLD CUP:
W,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0,0,W,0,0,0,0.
– FIRST TIME IN T20I HISTORY 🤯 pic.twitter.com/49CZEMbd67
— Johns. (@CricCrazyJohns) June 17, 2024
कोणत्याही गोलंदाजाने टी२० क्रिकेटमध्ये आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करणे आणि एकही धाव न देता विकेट घेणे हे आश्चर्यकारक आहे. पण, न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने आज हे काम करून दाखवलेय. पीएनजीविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात त्याने ही कामगिरी केली. विश्वचषक स्पर्धेत हे पहिल्यांदाच घडले आहे, तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये हे दुसऱ्यांदा हा विक्रम झालाय. (T20 World Cup, Lockie Ferguson)
4️⃣ OVERS 4️⃣ MAIDENS 🤯
Lockie Ferguson becomes the first bowler in Men’s #T20WorldCup history to bowl four maidens in a match 👏#NZvPNG | Read On ➡️ https://t.co/FAMNFlxbvi pic.twitter.com/ryUlq9BOkW
— ICC (@ICC) June 17, 2024
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर (Brian Lara Stadium in Trinidad) न्यूझीलंड (New Zealand) आणि पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) यांच्यातील सामना खेळला जात आहे. पावसामुळे हा सामना एक तास उशिराने सुरू झाला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर पापुआ न्यू गिनीचा संघ फक्त ७८ धावांत गारज झाला. २० षटकेही फलंदाजी करु शकले नाहीत. एकाही फलंदाजाला ३० धावसंख्या पार करता आली नाही. तर तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या केली. यामध्ये नॉर्मन वनुआ १४, चॉर्ल्स अमीनी १७, सेसे बाऊ १२ हे तीन फलंदाजच दुहेरी धावसंख्या पार करु शकले. लॉकी फर्ग्युसनने आपल्या कोट्यातील ४ षटके निर्धाव टाकली. त्याने ३ बळी घेतले. अशी कामगिरी करणारा तो कसोटी खेळणारा राष्ट्रीय संघातील पहिला गोलंदाज ठरला आहे. फर्ग्युसनने चॅड सोपर (एक धाव), चार्ल्स अमिनी (१७ धावा) आणि कर्णधार असद वाला (८ धावा) यांना बाद केले. (T20 World Cup, Lockie Ferguson)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community