दुखापत झाल्यामुळे टी-२० वर्ल्डकपमधून जसप्रीत बुमराह बाहेर झाला आहे. बुमराहच्या जागी या संघात कोणाचा समावेश होणार याबाबतची उत्सुकता सर्वांना होती. आता यासंदर्भात बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
( हेही वाचा : रेल्वेचे तात्काळ तिकीट बुक करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा; मिळेल कन्फर्म सीट )
दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, अशी माहितीही बीसीसीआयच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
मोहम्मद सिराजविषयी थोडक्यात माहिती
सिराजने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
सिराजने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला असून यात त्याने 10 सामन्यात 13 घेतल्या होत्या.
Join Our WhatsApp Community