- ऋजुता लुकतुके
पाकिस्तानी क्रिकेट संघाला क्रिकेट जगतात सगळ्यात बेभरवशी संघ मानलं जातं आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी त्यांच्या कामगिरीतून येतो. आताही टी-२० विश्वचषकात पाक संघ गटवार साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर पडला आहे. मायदेशात आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये त्यामुळे रोष पसरला आहे आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ तसंच कर्णधार बाबर आझमला काही कठीण प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू शकतात. पाकिस्तानचं केंद्र सरकार पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांनाही यावेळी पदावरून हटवू शकतं, अशा बातम्या पसरल्या आहेत. तर बाबर आझमही आता कर्णधार म्हणून पसंतीचा उमेदवार राहिलेला नाही. (T20 World Cup, Pakistan Exit)
खुद्द बाबरने हे कबूल केलं आहे. ‘आम्ही अख्ख्या स्पर्धेत संघ म्हणून एकजीव होऊन खेळलोच नाही. त्याचा फटका आम्हाला बसला. कप्तानीचं आता काय करायंच ते क्रिकेट मंडळच ठरवेल,’ असं तो हताशपणे म्हणाला. (T20 World Cup, Pakistan Exit)
(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये फूट पडण्याची चिन्हे)
पाकिस्तान संघातील काही त्रुटी प्रामुख्याने या स्पर्धेत दिसल्या.
- संघात तीन नेतृत्वाचे गड
बाबर आझम हा अधिकृत कर्णधार असला तरी सगळे खेळाडू त्याच्या नेतृत्वाला मानत नव्हते. उलट संघात तीन तट होते. एकदिवसीय विश्वचषकानंतर बाबरकडून कप्तानी काढून घेऊन ती शाहीन आफ्रिदीला देण्यात आली. आता अचानक आफ्रिदीकडून ती बाबरकडे गेल्याने आफ्रिदी नाजार होता. तर महम्मद रिझवान ज्येष्ठ खेळाडू असूनही त्याचा कप्तान म्हणून कधी विचार झाला नाही. त्यामुळे तो नाराज होता. आणि त्यातच बाबर आझमची पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. तरी तो फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे संघात नाराजी आणि अस्वस्था होती. (T20 World Cup, Pakistan Exit)
- स्पर्धेपूर्वीचं अपयश
या स्पर्धेपूर्वी पाक संघाने आयर्लंडचा दौरा केला आणि नवख्या न्यूझीलंड संघाबरोबर पाकने टी-२० मालिका खेळली होती. न्यूझीलंडने तर या मालिकेत आपला तिसऱ्या फळीतील संघ उतरवला होता. तरीही पाकिस्तानने त्या मालिकेत १ सामना गमावला होता. आयर्लंड विरुद्धची मालिकाही गमावली. या कामगिरीचं वेळेवर मूल्यमापन झालं नाही. (T20 World Cup, Pakistan Exit)
- फलंदाजांचं अपयश
मोहम्मद रिझवान, बाबर आझम हे संघाचे दोन खांब होते. पण, रिझवानच्या काही खेळी सोडल्या तर दोघांनी जमून खेळ केला नाही. इतर फलंदाजही अपयशी ठरले. त्यामुळे पाकला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यातच पावसानेही त्यांना मदत केली नाही. (T20 World Cup, Pakistan Exit)
- गोलंदाजांचा स्वैर मारा
तेज गोलंदाजांचा स्वैर मारा त्यांना महाग पडला. अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये पाकने नसीमला खेळवलं. त्याने तब्बल ५ धावा वाईड दिल्या. अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये धावांचा फरकही ५ धावांचा होता. मोक्याच्या क्षणी गोलंदाजही कमी पडले. हे अमेरिकेविरुद्धच्या निर्धारित २० षटकांतही दिसलं. (T20 World Cup, Pakistan Exit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community