- ऋजुता लुकतुके
शुक्रवारी अमेरिका आणि आयर्लंड दरम्यानचा सामना पावसात वाहून गेल्यामुळे अमेरिकेला एक आयता गुण मिळाला. आणि ५ गुणांसह त्यांनी सुपर ८ मध्ये प्रवेश केला. पाकिस्तान संघाला मात्र अमेरिका आणि भारताविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना स्पर्धेतून गाशा गुंडाळण्याची वेळ आली. (T20 World Cup, Pakistan’s Exit)
आधीच माजी खेळाडू संघाच्या कामगिरीवर तोंडसुख घेत आहेत. अमेरिकेविरुद्धचा पराभव पाठिराख्यांच्याही जिव्हारी लागलाय. आणि इंटरनेटवर त्यामुळे मिम्सचा सुकाळ आलाय. ‘बाय बाय पाकिस्तान’ असा हॅशटॅगच व्हायरल झाला आहे. आणि बाबर आझम आणि आझम खान हे दोन खेळाडू सर्वाधिक ट्रोल होत आहेत. काही मिम्स बघूया, (T20 World Cup, Pakistan’s Exit)
Bye Bye Pakistan!
PKMB! pic.twitter.com/aRuDimGwCC
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) June 14, 2024
Bye Bye Pakistan🤣👋🏻#USAvsIRE pic.twitter.com/LHDXY9TaVh
— Abhishek (@be_mewadi) June 14, 2024
Pakistan out of World Cup…🤣🤣🤣#USAvsIRE #PakistanCricket #Karachi #ShubhmanGill #INDvsCAN #Karachi #Nizam #PakistanNews #T20WorldCup #Lahore #Florida
Congratulations USA | Super 8 | Rain | USA and India | Bye bye | Sri Lanka | 2026 T20 World Cup | Babar Azam | Saurabh… pic.twitter.com/sp6VmjaWld— इंदु (@Congress_Indira) June 14, 2024
Bye bye Pakistan 😂
pic.twitter.com/j7bTAQZ4F3— Nisha (@NishaRo45_) June 14, 2024
Congratulations Pakistan for winning ticket to Karachi airport Bye Bye Qudrat ka Nizam #USAvsIRE pic.twitter.com/MB6mSAJ0ID
— Ex Bhakt (@exbhakt_) June 15, 2024
🚨 Azam Khan will not travel with the team back to Pakistan as he is yet to explore the restaurants in Florida pic.twitter.com/GcWZ7EqdIs
— Dinda Academy (@academy_dinda) June 14, 2024
(हेही वाचा – बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश)
अमेरिकन संघाने पहिल्या सामन्यात कॅनडाचा धुव्वा उडवला होता. आणि त्यानंतर पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये हरवत त्यांनी दोन गुण वसूल केले. २ सामन्यांतून ४ गुण झाले असताना, आयर्लंड विरुद्धचा सामना पावसात वाहून गेला. तो १ गुणही त्यांना मिळाला. उलट पाकिस्तानचे ३ सामन्यांतून २ च गुण झाले आहेत. आणि आयर्लंड विरुद्ध विजय मिळवला तरी ते ४ गुणांवरच राहतील. (T20 World Cup, Pakistan’s Exit)
स्पर्धेदरम्यान पाक संघात तट पडल्याचं चित्रही काही पत्रकारांनी रंगवलं. संघातील एक खेळाडू आझम खानच्या शरीरयष्टीवरून तो ट्रोल झाला. बाबर आझमही उघडपणे त्याच्या तंदुरुस्तीवर हावभाव करताना मीडियाला दिसला. आताही चाहत्यांकडून आझम खान ट्रोल होताना दिसतोय. ‘पाकिस्तान हरले तरी आझम खान अमेरिका सोडणार नाही. कारण…त्याला फ्लोरिडातील सर्व हॉटेल जेवणासाठी पालथी घालायची आहेत!’ असं एक मिमही व्हायरल झालं आहे. (T20 World Cup, Pakistan’s Exit)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community