T20 World Cup Prize Money: विश्वचषक जिंकताच टीम इंडियाला मोठा धनादेश तर, उपविजेत्या संघाला काय?

227
T20 World Cup, India Champion : विश्वचषक विजेता भारतीय संघ गुरुवारी सकाळी पोहोचणार नवी दिल्लीत

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली (Virat Kohli) सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (T20 World Cup Prize Money)

(हेही वाचा –T20 World Cup Final: विश्वचषक घेताना रोहित शर्माच्या अंगात संचारलं मेस्सीचं भुत; अनं केल असं काही… पाहा संपूर्ण Video)

भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीने दोन्ही संघांना बक्षिसाची रक्कम (T20 World Cup Prize Money) जाहिर केली आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ सुरू होण्याच्या वेळी बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. यावेळी टी-२० विश्वचषकासाठी अंदाजे ९३.५ कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकण्यासाठी २०.३६ कोटी रुपयांच बक्षीस रक्कम मिळाली आहे. तर उपविजेता ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघालाही मोठी रक्कम मिळाली आहे. आफ्रिकन संघाला १०.६४ कोटी रुपये मिळाले आहेत. (T20 World Cup Prize Money)

(हेही वाचा –T20 World Cup Final: बार्बाडोसच्या मैदानात रोवला भारताचा ध्वज; सामना कसा अन् कुठे फिरवला? वाचा सविस्तर…)

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही आयसीसीकडून बक्षिसांची मोठी रक्कमही मिळाली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ६.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुपर८ पर्यंत पोहोचलेल्या संघांना ३.१८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये मिळाले आहेत. (T20 World Cup Prize Money)

टी-२० विश्वचषक २०२४ च्या बक्षिसाची रक्कम (T20 World Cup Prize Money)

  • विजेता- २०.३६ कोटी रुपये
  • उपविजेते – १०.६४ कोटी
  • उपांत्य फेरीत पराभूत – ६.५५ कोटी रुपये
  • सुपर ८ संघ – ३.१८ कोटी रुपये
  • ९ ते १२ क्रमांकावर असलेल्या संघांना – २.०६ कोटी रुपये
  • १३ ते २० क्रमांकावर असलेल्या संघांना – १.८७ कोटी रुपये
  • प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला बोनस – रु २६ लाख

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.