- ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने भारतीय वेळेनुसार, गुरुवारी मध्यरात्री इंग्लंड संघाचा ६७ धावांनी धुव्वा उडवत टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. भारताने पहिली फलंदाजी करत ७ बाद १७१ धावा केल्या. याला उत्तर देताना इंग्लिश डाव १०३ धावांतच गुंडाळला गेला. अक्षर पटेलने २३ धावांत ३ तर कुलदीप यादवने १९ धावांत ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराने (Jasprit Bumrah) दोन बळी मिळवले. हा सामना संपल्यानंतर भारतीय ड्रेसिंग रुममध्ये वेगळंच वातावरण होतं. खुद्द कर्णधार रोहित शर्मा अश्रूंना वाट मोकळी करून देतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. (T20 World Cup, Rohit Sharma)
(हेही वाचा- Karnataka Accident: कर्नाटकात भीषण अपघात! भाविकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक; १३ जणांचा मृत्यू)
सामना संपवून खेळाडू ड्रेसिंग रुमकडे परतत आहेत. रोहित रुमच्या बाहेरच चेहरा झाकून बसलेला आहे, असं या व्हीडिओत दिसतं. विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्याशी बोलताना दिसतो. रोहित बरोबर ७३ धावांची महत्त्वाची भागिदारी रचणारा सूर्यकुमारही (Suryakumar) रोहितच्या गुडघ्यांवर हात ठेवून त्या थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. (T20 World Cup, Rohit Sharma)
A picture speaks a thousand words.
Thank you, Rohit Sharma! ❤️
Congratulations, Team India! #INDvsENG2024 pic.twitter.com/tnzB9rfn6G— Urrmi (@Urrmi_) June 27, 2024
भारतीय संघ आता २९ जूनला बार्बाडोस इथं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. दोन्ही संघ आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित आहेत. पण, आफ्रिकन संघाला अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध विजयासाठी प्रयत्न करावे लागले होते. तर भारतीय संघाने मिळवलेला प्रत्येक विजय हा निर्विवाद आहे. सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी आणि आता उपान्त्य फेरीत इंग्लंडला ६७ धावांनी हरवत भारताने अंतिम फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेनंही उपान्त्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला आहे. (T20 World Cup, Rohit Sharma)
(हेही वाचा- Vasai: पावसाळी पिकनिकला जाताय? वसईतील ‘या’ पर्यटनस्थळांवर ८ जुलैपर्यंत बंदी; वाचा सविस्तर…)
भारताने २०१३ च्या चॅम्पियन्स करंडकानंतर आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. अगदी ७ महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत घरच्या मैदानावर त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे यावेळी भारतीय संघाचा प्रयत्न असेल तो विजयाचाच. (T20 World Cup, Rohit Sharma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community