- ऋजुता लुकतुके
सुपर ८ मधील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (T20 World Cup, SA vs Eng) सामन्याचं वर्णन आफ्रिकेनं दोनदा हातातून निसटू दिलेला सामना अखेर कसाबसा जिंकला, असंच करावं लागेल. दुसरं म्हणजे इंग्लंडने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणं पसंत केलं असताना आफ्रिकेला १६० धावा करू दिल्या तिथे थोडाफार सामना इंग्लंडच्या विरोधात झुकला होता. त्याचाही आफ्रिकन संघाला फायदा झाला. पहिल्यांदा त्यांच्या हातातून सामना निसटला तो १३ षटकांत ३ बाद १०३ धावसंख्या असताना नंतरच्या षटकांत कमी झालेल्या धावगतीमुळे. पुढच्या ७ षटकांत फक्त ६० धावा झाल्या. चांगल्या सुरुवातीनंतर आफ्रिकन संघाला विशाल धावसंख्या रचता आली नाही. (T20 World Cup, SA vs Eng)
(हेही वाचा- भाजपाची रणनिती ठरली, विधानसभेआधी मोठे बदल होणार? Chandrasekhar Bawankule म्हणाले…)
त्यानंतर इंग्लंडची अवस्था ४ बाद ६१ असताना रबाडा (Rubada) आणि बार्टमन (Bartman) यांना विंडिजमधील वाऱ्याचा अंदाज आला नाही. फुलटॉस चेंडूंवर लियम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि हॅऱी ब्रूक (Harry Brook) यांनी जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी ७८ धावांची भागिदारीही रचली. अखेर कासिगो रबाडाने लिव्हिंगस्टोनला ३३ धावांवर बाद केलं. पाठोपाठ नॉरयेनं ब्रूकला बाद केलं तेव्हा कुठे दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकता आला. मार्करमने ब्रूकचा ५३ धावांवर अप्रतीम झेल टिपला. (T20 World Cup, SA vs Eng)
The Proteas have clinched a thriller 🤩🇿🇦
A remarkable bowling effort helps South Africa stay unbeaten in the #T20WorldCup 2024 🔥#ENGvSA | 📝: https://t.co/B2JSqzDbSU pic.twitter.com/WORk8Rv3aF
— ICC (@ICC) June 21, 2024
त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकन संघाने पहिली फलंदाजी करत ६ बाद १६३ धावा केल्या त्या क्विंटन डी कॉकच्या (Quinton de Kock) ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर. डेव्हिड मिलरने (David Miller) ४२ धावा करत त्याला चांगली साथ दिली. बाकी आफ्रिकन फलंदाज झटपट बाद झाले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) ४० धावांत ३ बळी मिळवले. सुपर ८ मध्ये दुसऱ्या गटात आफ्रिका आणि इंग्लंडमधील लढाई ही वर्चस्वाची लढाई होती. कारण, हे दोन संघ गटातील अव्वल संघ आहेत. (T20 World Cup, SA vs Eng)
(हेही वाचा- T20 World Cup, WI vs USA : वेस्ट इंडिजकडून अमेरिकेची धूळधाण, ९ गडी, ५५ चेंडू राखून विजय)
ही लढाई जिंकून आता आफ्रिकन संघाने दुसऱ्या गटात अव्वल क्रमांक पटकावला आहे. बाद फेरीतील स्थानही जवळ जवळ पक्कं केलं आहे. (T20 World Cup, SA vs Eng)
हेही पहा-