T20 World Cup, SA vs Nep : नेपाळने जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी जेरीला आणलं….

T20 World Cup, SA vs Nep : शेवटच्या चेंडूवर गुलशन झा धावचीत झाल्यामुळे नेपाळला ही एक धाव कमी पडली 

146
T20 World Cup, SA vs Nep : नेपाळने जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी जेरीला आणलं….
T20 World Cup, SA vs Nep : नेपाळने जेव्हा दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी जेरीला आणलं….
  • ऋजुता लुकतुके

एरवी डी गटात दक्षिण आफ्रिकेचा संघ (T20 World Cup, SA vs Nep) अपेक्षेप्रमाणेच अव्वल होता. तर नेपाळचा संघ एका गुणासह तळाला होता. पण, यंदाच्या टी-२० विश्वचषकाचा स्वभावच बनलाय सनसनाटी निकाल देण्याचा. तसंच काहीसं द आफ्रिका विरुद्ध नेपाळ सामन्यातही घडेल असं वाटत होतं. आधी नेपाळने आफ्रिकन संघाला ७ बाद ११५ धावांत रोखलं. रझा हेनरिक्सने (Raza Henriques) सलामीला येत ४३ धावा केल्या. पण, मधली फळी दिपेंदर सिंग ऐरीने (Dipendra Singh Airy) कापून काढली. २१ धावांत ३ बळी त्याने घेतले. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अवस्था ५ बाद ९७ झाली होती. (T20 World Cup, SA vs Nep)

(हेही वाचा- Sikkim Flood : सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार! हजारो पर्यटक अडकले, 6 जणांचा मृत्यू)

पण, त्यानंतर ट्रिस्टियन स्टब्जने (tristan stubbs) १८ चेंडूंत २७ धावा करत आफ्रिकन संघाला निदान ११५ धावांपर्यंत पोहोचवलं. त्याने वाढवलेली प्रत्येक धाव पुढे निर्णायक ठरली. कुशल भुरटेलनेही (Kushal Bhurtel) १९ धावा देत ४ बळी मिळवले. (T20 World Cup, SA vs Nep)

 ११५ ही धावसंख्या ही या विश्वचषकाचा इतिहास बघता ठिकच वाटत होती. पण, नेपाळने आपला डाव सुरू करेपर्यंतच. कारण, आसिफ शेख (Asif Shaikh) आणि भुरटेल यांनी नेपाळला सलामीच ३५ धावांची करून दिली. त्यांचा धावांचा वेगही षटकामागे सहा धावांचा होता. भुरटेल बाद झाल्यावर अनिल साह आला. तो ही आसिफसह धावा वाढवत होता. अगदी नेपाळचं शतक फलकावर लागलं तेव्हा त्यांचे तीनच गडी बाद झाले होते. विजय आवाक्यातला वाटत होता. (T20 World Cup, SA vs Nep)

इतक्यात आफ्रिकन कर्णधार मार्करमने (Markram) स्वत:ला गोलंदाजीची संधी दिली. पहिल्याच षटकात त्याने जम बसलेल्या अनिल साहला २७ धावांवर बाद केलं. आणि त्यानंतर तो एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने त्याने फिरकीपटू शाम्सीला आणलं. तिथे बाजी पलटली. शाम्सीने तर आसिफला ४२ धावांवर बेमालूम त्रिफळाचीत केलं. आणि आफ्रिकन संघाने सुस्कारा सोडला. (T20 World Cup, SA vs Nep)

(हेही वाचा- Rain Update: मुंबई, पुण्यासह कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस? हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्या)

तरीही सोमपाल कामीने १९व्या षटकात षटकार आणि गुलशन झाने शेवटच्या षटकात चौकार मारून प्रयत्न सुरूच ठेवले होते. शेवटच्या एका चेंडूवर नेपाळला दोन धावा हव्या होत्या. बरोबरीसाठी किमान एक. पण, नेमका गुलशन धावचीत झाला. नेपाळला मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव नव्हता. आणि तीच गोष्ट विजयाच्या आड आली. प्रोव्हिडन्स मैदानावर हा सामना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी मात्र मोठ्या प्रमाणावर केली होती. नेपाळने जिगरबाज खेळीने लोकांची मनही जिंकली. तबरेझ शाम्सीने १९ चेंडूंत ४ बळी टिपले. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  (T20 World Cup, SA vs Nep)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.