- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकाच्या (T20 World Cup, SA vs USA) पहिल्या सुपर ८ सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आपली पहिली आयसीसी स्पर्धा खेळणाऱ्या अमेरिकेला १८ धावांनी हरवलं. आफ्रिकेनं पहिली फलंदाजी करत ४ बाद १९६ धावा केल्या. पण, अमेरिकेनंही त्याला ६ बाद १७६ धावांचं प्रत्युत्तर देऊन आपणही अनुभवी संघांपेक्षा कमी नाही, हे दाखवून दिलं. अमेरिकन मधली फळी जर थोडी मैदानावर टिकली असती तर कदाचित सामन्याचा निकालही वेगळा लागला असता. (T20 World Cup, SA vs USA)
(हेही वाचा- MSP Increased: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खरीप पिकांच्या हमी भावात वाढ, जाणून घ्या नविन दर काय आहेत?)
आफ्रिकन संघाविरुद्ध आणि मोठ्या स्पर्धेत सुपर ८ मध्ये खेळताना नवख्या अमेरिकन फलंदाजांनी अजिबात गोंधळ होऊ दिला नाही. सलामीवीर स्टिव्हन टेलर आणि आंद्रेस गॉस (Andres Goss) यांनी ३३ धावांची सलामी दिली. यात टेलरचा वाटा २४ धावांचा. तो बाद झाल्यावर गॉस दुसऱ्याबाजूने सुसाट सुटला. ४७ चेंडूंत ८० धावा करताना त्याने ५ षटकार आणि ५ चौकार ठोकले. त्याला इतर फलंदाजांनी साथ दिली नाही. नितिश कुमार (८), जोन्स (०), शयन जहांगीर (२) झटपट बाद झाले. त्यामुळे अमेरिकेचं गणित बिघडलं. अखेर हरमित सिंगने (Harmeet Singh) २२ चेंडूंत ३८ धावा करत पुन्हा एकदा अमेरिकेसाठी आव्हान उभं केलं होतं. पण, तो बाद होईपर्यंत सामन्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. (T20 World Cup, SA vs USA)
कासिगो रबाडाने (Kasigo Rabada) ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी मिळवले.
South Africa get the better of the USA in a close clash in Antigua 🤩
Watch the extended match highlights 📺#T20WorldCup #USAvSAhttps://t.co/qPPa86L8JR
— ICC (@ICC) June 19, 2024
त्यापूर्वी आफ्रिकन संघाने १९४ धावा केल्या त्या क्विंटन डी कॉकच्या ७० आणि एडन मार्करमच्या ४६ धावांच्या जोरावर. डी कॉकने ४० चेंडूंत ५ षटकार आणि ७ चौकार ठोकले. तर हेनरिक क्लासेनने ३६ आणि ट्रिस्टियन स्टब्जने २० धावा करत आफ्रिकन संघाला दोनशेच्या जवळ आणलं. दोघांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद अर्धशतकी भागिदारी केली. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी करताना ४ षटकांत फक्त १८ धावा देत दोन बळी मिळवले. तर हरमित सिंगनेही २४ धावांत बळी घेतले. (T20 World Cup, SA vs USA)
(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Afg : भारत, अफगाणिस्तान लढतीतील आकड्यांचा खेळ, कोण फॉर्मात, कुणी जिंकले किती सामने?)
क्विंटन डी कॉकलाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. (T20 World Cup, SA vs USA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community