- ऋजुता लुकतुके
यंदाच्या टी-२० विश्वचषकात सौरभ नेत्रावळकरने (Saurabh Netravalkar) लक्षवेधी कामगिरी केली आहे. अमेरिकेकडून खेळणाऱ्या या डावखुऱ्या तेज गोलंदाजाने भारताविरुद्ध तर विराट कोहलीचा बळी पहिल्याच चेंडूवर मिळवला. एकूण ३ सामन्यांत त्याने आतापर्यंत ४ बळी टिपले आहेत. यातील एक सामना तर पावसात वाहून गेला. सौरभ मुंबईत लहानाचा मोठा झाला आणि भारताकडून १९ वर्षांखालील गटात तो विश्वचषकही खेळला आहे. पण, २३ व्या वर्षी तो भारतीय संघात संधी न मिळाल्यामुळे क्रिकेटपासून लांब गेला आणि अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेला. तिथे आता तो सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलमध्ये अभियंता म्हणून काम करतो आणि शनिवार. रविवार क्रिकेट खेळतो. अमेरिकन संघात त्याला संधी मिळाली आणि टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने त्याचं कौशल्य पुन्हा एकदा वापरता आलं. (T20 World Cup Saurabh Netravalkar)
पण, अमेरिकेत क्रिकेट पूर्ण वेळचा रोजगार होऊ शकत नाही. त्यामुळे तो नोकरीही करतो आहे. सराव किंवा सामना संपल्यानंतर तो हॉटेलमधूनच कंपनीचं काम पूर्ण करतो. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये केलेल्या कामगिरीमुळे तो पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. भारताविरुद्ध तर त्याने रोहित आणि विराट हे बळी मिळवले. पण, हे करताना तो क्रिकेट संपल्यावर ऑफिसचं कामही करत होता. (T20 World Cup Saurabh Netravalkar)
Thank you Sir 🙏👍 very nice to hear from you! https://t.co/r6lYb9A4WO
— Saurabh Netravalkar (@Saurabh_Netra) June 20, 2023
(हेही वाचा – Government of Kenya : केनिया सरकारचा धक्कादायक निर्णय; १० लाख भारतीय वंशाच्या कावळ्यांना मारण्याची योजना आखली? वाचा सविस्तर…)
अमेरिकेत गेल्यापासून आपलं काम आणि क्रिकेट असं संतुलन त्याला ठेवावं लागलं आहे. शनिवारी क्रिकेट खेळण्यासाठी तो ४ तास प्रवास करून लॉस एंजलीसला जात होता. तसंच आता तो कंपनीचं काम करता करता विश्वचषकात खेळत आहे. त्याची बहीण निधी नेत्रावळकरने मीडियाशी बोलताना ही गोष्ट सांगितली. ‘कामाच्या स्वरुपामुळे तो कुठूनही काम करू शकतो. कार्यालयातच हजर असण्याची गरज नाही. पण, सौरभ कामाप्रती निष्ठा असलेला माणूस आहे. तो लॅपटॉप जवळ बाळगतो आणि कुठलंही काम अर्धवट टाकत नाही. आताही सामना संपला की, लगेच हॉटेलमध्ये जाऊन तो कंपनीचं काम करतो,’ असं निधीने क्रिकेट नेक्स्ट या वेबसाईटला सांगितलं. वेळेशी स्पर्धा आणि संतुलन या गोष्टी मुंबईकर असण्याने त्याच्यात भिनल्या आहेत, असं बहीण निधी म्हणाली. (T20 World Cup Saurabh Netravalkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community