T20 World Cup, Shubman Gill : शुभमन गिल बेशिस्त वागण्याच्या आरोपाविषयी काय म्हणाला?

T20 World Cup, Shubman Gill : राखीव खेळाडू म्हणून संघाबरोबर असलेला शुभमन आता भारतात परत येणार आहे.

206
T20 World Cup, Shubman Gill : शुभमन गिल बेशिस्त वागण्याच्या आरोपाविषयी काय म्हणाला?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) अमेरिका सोडण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायराबरोबर एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. टी-२० विश्वचषकात शुभमनची भारतीय मुख्य संघात निवड झाली नाही. तो राखीव म्हणून संघाबरोबर होता. अमेरिकेतील पहिली टप्पा पार पडल्यानंतर आता शुभमन आणि आवेश खान हे दोन राखीव खेळाडू मायदेशी परतणार आहेत. शुभमनच्या बाबतीत मध्यंतरी दोन अफवा पसरल्या होत्या. एकतर त्याने रोहितला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे आणि दुसरं म्हणजे विश्वचषक संघात त्याची निवड न होण्याचं कारण त्याची बेशिस्त वागणूक हे होतं. (T20 World Cup, Shubman Gill)

नवीन पोस्टच्या माध्यमातून शुभमनने या दोन आरोपांना उत्तर दिलेलं दिसत आहे. कारण, त्याची कॅप्शन आहे, ‘रोहितकडून मी आणि सॅमी शिस्त शिकून घेतोय!’ (T20 World Cup, Shubman Gill)

New Project 2024 06 17T135746.089

(हेही वाचा – Crime: बळी दिलेल्या जनावरांच्या यादीत गायींचा समावेश, मुस्लिम धर्मगुरुला अटक)

दोघांमधील बेबनावाची बातमी खोटी असल्याचं काही वर्तमानपत्रांनी लगेचच नमूद केलं होतं. आता या पोस्टमधूनही त्याला दुजोरा मिळत आहे. शुभमनने (Shubman Gill) रोहितला अनफॉलो केलं नसल्याचंही स्पष्ट होतंय. २०२३ च्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने धुवाँधार कामगिरी करत ऑरेंज कॅप जिंकली होती. पण, २०२४ मध्ये तोच फॉर्म त्याला दाखवता आला नाही. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याने थोडाफार जोर लावला आणि २०२४ हंगामात १२ सामन्यांत ४२६ धावा केल्या. (T20 World Cup, Shubman Gill)

पण, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही फॉर्मसाठी झगडणारा शुभमन भारतीय संघाच्या रणनीतीत बसत नव्हता. त्यामुळे विश्वचषकासाठीच्या संघात त्याला जागा मिळाली ती राखीव खेळाडू म्हणून. शुभमन आता भारतात परतेल. तर भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. इथं भारतीय गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ असतील. (T20 World Cup, Shubman Gill)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.