भारतीय संघाने टी-२० विश्वचषकातील सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत विजय मिळवला. भारतीय संघातील विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव या फलंदाजांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. भारत रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धा तिसरी मॅच खेळणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेने सामन्यापूर्वीच भारताला चॅलेंज केले आहे.
( हेही वाचा : प्रतापगडावर अवतरला शिवकाळ; ४०० मशालींचा लखलखाट!)
भारतीय संघाला चॅलेंज
दक्षिण आफ्रिकेत तेज गोलंदाज असल्यामुळे यांच्याविरुद्ध भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाविरुद्ध आणखी एक तेज गोलंदाज खेळवण्याची शक्यता आहे. पर्थच्या मैदानावर जलदगती गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली असे लांस क्लूजनर यांनी सांगितले. लांस क्लूजनर याने आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध अधिक धावा करणे शक्य होणार नाही असे सांगत भारतीय संघाला त्याने चॅलेंज केले आहे.
भारतीय संघ
रोहित शर्मा ( कर्णधार), केएल राहूल ( उपकर्णधार ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
Join Our WhatsApp Community