- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धा आता सुपर ८ टप्प्यात आली आहे. येत्या बुधवारपासून दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या सामन्याने सुपर ८ ला सुरुवात होईल. सुपर ८ चे रोज दोन सामने होणार आहेत. बांगलादेशने नेपाळचा २१ धावांनी पराभव करत सुपर ८ गाठली आहे. त्यामुळए सुपर ८ च्या दोन्ही गटांचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. पहिल्या गटात ऑस्ट्रेलिया, भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे चार संघ असतील. तर दुसऱ्या गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका हे संघ असतील. (T20 World Cup, Super 8)
बांगलादेश सुपर ८ मध्ये प्रवेश करणारा शेवटचा संघ ठरला आहे. त्यांनी सोमवारी नेपाळचा पराभव करत सुपर ८ गाठली. धावांचा फरक २१ दिसत असला तरी हा सामना बांगलादेशसाठी सोपा नव्हता. जोपर्यंत कुशल मल्ला आणि दीपेंद्र ऐरी मैदानात होते नेपाळ विजय मिळवेल असंच वाटत होतं. कारण विजयासाठी लक्ष्य होतं १०७ धावाचं. पण, मुस्तफिझुर रेहमानने दिपेंद्रला बाद केलं आणि एकोणीसावं षटक निर्धाव टाकलं. त्यामुळे बांगलादेशला विजय मिळाला. (T20 World Cup, Super 8)
Super Eight groups are locked 🔒
Who are the favourites to make it to the #T20WorldCup 2024 semi-finals? 👀 pic.twitter.com/fe0OkJpx2t
— ICC (@ICC) June 17, 2024
(हेही वाचा – Zomato Share Price : झोमॅटोवर आता चित्रपटाची तिकिटंही मिळणार? पेटीएमबरोबर बोलणी सुरू)
आता सुपर ८ चं वेळापत्रक पाहूया. भारतीय संघ आपले तीन सामने २० जून (वि. अफगाणिस्तान), २२ जून (वि. बांगलादेश) आणि २४ जून (वि. ऑस्ट्रेलिया) या दिवशी खेळणार आहे. (T20 World Cup, Super 8)
यानंतर गुरुवारी २७ जूनला पहिला उपांत्य सामना सकाळी सहा वाजता तर त्याच दिवशी रात्री आठ वाजता दुसरा उपांत्य सामना होणार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला तर त्यांचा सामना हा २७ तारखेला रात्री आठ वाजता होईल हे आधीच ठरवण्यात आलंय. दोन्ही उपांत्य सामने हे टॅरोबा आणि प्रोव्हिडन्स इथं अनुक्रमे होणार आहेत. २९ तारखेला अंतिम फेरीचा सामना ब्रिजटाऊनला होईल. (T20 World Cup, Super 8)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community