भारताचा रविवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. पण या पराभवानंतर भारतीय संघाला टी-२० विश्वचषकातून अजून एक धक्का बसला आहे. या सामन्यादरम्यान भारताच्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे हा खेळाडू संघाबाहेर होऊ शकतो. सलग दोन विजय मिळवल्यानंतर भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला. या पराभवानंतर भारताची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून दक्षिण आफ्रिकेचा संघ आता अव्वलस्थानी पोहोचला आहे.
( हेही वाचा : मुंबई मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! ५९६ जागा रिक्त; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख)
अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर?
भारताचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकला यष्टीरक्षण करताना पाठीला दुखापत झाली आहे. ही दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची होती की, त्याला तातडीने मैदान सोडावे लागले आणि यष्टिरक्षणासाठी दिनेश कार्तिक मैदानात आला. दुखापत गंभीक असल्यामुळे पुढच्या सामन्यात भारतीय संघ दिनेश कार्तिकला विश्रांती देईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यासाठी कार्तिक हा संघाबाहेर असला तर त्याच्या जागी यष्टीरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतकडे असणार आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हा मोठा बदल भारतीय संघात पहायला मिळणार आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत होणार असून हा सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल. हा सामना जिंकून भारताला उपांत्य फेरी गाठणे शक्य होणार आहे.
Join Our WhatsApp Community