T20 World Cup, US vs Pak : नवख्या अमेरिकन संघाचा पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये दे धक्का 

T20 World Cup, US vs Pak : निर्धारित २० षटकांत दोन्ही संघांची १५९ वर बरोबरी झाल्यावर सुपर ओव्हरची मदत घ्यावी लागली 

179
T20 World Cup, US vs Pak : नवख्या अमेरिकन संघाचा पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये दे धक्का 
T20 World Cup, US vs Pak : नवख्या अमेरिकन संघाचा पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये दे धक्का 
  • ऋजुता लुकतुके 

अमेरिकन क्रिकेट संघाला ते यजमान असल्याच्या निकषावर या टी-२० विश्वचषकात (T20 World Cup, US vs Pak) प्रवेश मिळाला. देशात क्रिकेटची संघटना काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्हती. क्रिकेटचं वातावरण तर नव्हतंच नव्हतं. पण, विश्वचषकाच्या दुसऱ्याच सामन्यात त्यांनी कमाल करून दाखवली आहे. समोर पाकिस्तानसारख्या तगड्या संघाचं आव्हान होतं. नसॉ काऊंटी स्टेडिअमची खेळपट्टी कसं वागेल कुणाला माहीत नव्हतं. पहिल्या डावात पाकिस्तानने या खेळपट्टीवरील विजयी धावसंख्या ६ बाद १५९ केलेली होती.  (T20 World Cup, US vs Pak)

(हेही वाचा- Sunanda Pawar : “पवार कुटुंब पुन्हा एकत्र…”, रोहित पवारांच्या आई नेमकं काय म्हणाल्या?)

पण, अमेरिकन संघात गुरुवारी काय संचारलं होतं कुणास ठाऊक? १६० धावांचं लक्ष्य पार करू शकतील, अशी फलंदाजी त्यांनी सुरू केली. कर्णधार मोनांक पटेलच्या (Monak Patel) ५०, आंद्रियास गौसच्या (Andreas Gauss) ३५ आणि एरॉन जोन्सच्या (Aaron Jones) नाबाद ३६ धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत त्यांनी ३ बाद १५९ धावा करत बरोबरी साधली. खरंतर इथंच अमेरिकेचा विजय व्हायचा. पण, ती राहिलेली कसर संघाने सुपर ओव्हरमध्ये भरून काढली.  (T20 World Cup, US vs Pak)

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेनं एका षटकांत बिनबाद १८ धावा केल्या. तर पाकिस्तानने एक गडी गमावत १३ धावा केल्या. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझमने ४४ धावा केल्या. तर शदाब खान ४० धावा करून बाद झाला. तळाला शाहीन आफ्रिदीने नाबाद २३ धावा करत संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. अमेरिकेसाठी केनजिगे आणि सौरभ नेत्रावळकर या सलामीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. केनजिगेनं ३० धावांत ३ बळी घेतले. तर सौरभ नेत्रावळकरने ४ षटकांत १८ धावा देत २ बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्येही नेत्रावळकरची कामगिरी प्रभावी ठरली. तर पाकच्या आमीरने या षटकांत दोनदा वाईड चेंडूवर ४ धावा दिल्या. (T20 World Cup, US vs Pak)

(हेही वाचा- Parliament News: संसदेत माजी मुख्यमंत्री, सेलिब्रिटी, राजकीय कार्यकर्ता, माजी न्यायमूर्तींसह २८० नवे खासदार कोण ? जाणून घ्या)

पाकिस्तानच्या धक्कादायक पराभवानंतर चाहते अर्थातच नाराज झाले आहेत. आणि इंटरनेटवर संघावर टिकेची झोड उठली आहे. (T20 World Cup, US vs Pak)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.