भारतीय क्रिकेटपटू सध्या टी-२० विश्वचषकानिमित्ता ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. क्रिकेटपटूंचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याची क्रेझ परदेशात सुद्धा आहे. सध्या पाकिस्तान विरुद्धच्या कामगिरीनंतर जगभरात विराट फिव्हर सुरू आहे. त्याच्या वैयक्तित आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल सुद्धा लोकांच्या मनात उत्सुकता असते. सध्या कोहली टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय तेथील कर्मचाऱ्यांनी त्याच्या रुमचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसिद्ध केला. हॉटेल रुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला. या प्रकरणी हॉटेलने सुद्धा त्याची माफी मागितली आहे.
( हेही वाचा : मुंबई ते अलिबाग सुसाट प्रवास! देशातील पहिली हायस्पीड वॉटर टॅक्सी सुरू होणार; किती असणार भाडे?)
…अन् कोहली संतापला
टीम इंडियाचे खेळाडू क्राऊन पर्थमध्ये राहत आहेत. दरम्यान या हॉटेलमधील विराट कोहलीच्या रुमचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता हॉटेल क्राऊन पर्थने माफी मागितली आहे. व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर आता विराटने इंस्टाग्रामवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी हॉटेलने त्याची माफी मागितली आहे. तसेच ही पोस्ट बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आले आहे.
विराट कोहलीच्या रुमचा व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
हॉटेलने मागितली माफी
हॉटेल क्राऊन पर्थने या प्रकरणात सांगितले आहे की, आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विराटच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ काढणारा कर्मचारी कंत्राटी आहे. ज्या कर्मचाऱ्याने कोहलीच्या रुमचा व्हिडिओ काढून व्हायरल केला त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आमच्याकडून झालेल्या निष्काळजीपणाबद्दल माफी मागतो. आवश्यक कठोर पावले उचलली जातील संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून हटवण्यात आले आहे. यापुढे असे होणार नाही असे स्पष्टीकरण हॉटेलने दिले आहे.
Join Our WhatsApp Community