- ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने सुपर ८ मध्ये तर आरामात मजल मारली. पण, न्यूयॉर्क सोडल्यानंतर संघाला धड सरावही करता आला नाही, याची सल संघातील खेळाडूंना आहे. फ्लोरिडा राज्यात लाऊडरहिलमध्ये शेवटचे साखळी सामने आहेत. पण, तिथे अव्याहत पाऊस सुरू होता. त्यामुळे सलामीवीर आणि स्टार खेळाडू विराट कोहलीही सुपर ८ पूर्वी महत्त्वाच्या सरावाला मुकला. पहिल्या तीन सामन्यांत तो अपयशी ठरला. त्यामुळेच कॅनडा विरुद्ध सरावाची अपेक्षा त्याला होती. वेस्ट इंडिजमध्ये सुपर ८ ला जाण्यापूर्वी भारताला एकमेव चिंता आहे ती विराटच्या फॉर्मची. (T20 World Cup Virat Kohli)
विराटचा नवखा संघ सहकारी शिवम दुबेनं मात्र विराटवरील एका प्रश्नाला सडेतोड उत्तर देऊन लोकांची मनं जिंकली आहेत. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर शिवमने मीडियाशी संवाद साधला आणि तेव्हा त्याने विराटच्या फॉर्मविषयी शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर दिलं. शिवम दुबेनं म्हटलं की विराट कोहली आगामी सामन्यांमध्ये फॉर्ममध्ये परत येईल. कोहलीला त्याच्या टीकाकारांना गप्प करायला वेळ लागणार नाही. विराटला जे बोलायचं आहे तो त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून दाखवून देईल. (T20 World Cup Virat Kohli)
(हेही वाचा – मराठी, हिंदू माणूस दुखावला गेलाय, वचपा काढल्याशिवाय राहणार नाही; Pravin Darekar यांचा ठाकरेंना इशारा)
विराट कोहलीबाबत कोणी चर्चा करणार नाही – शिवम दुबे
विराट कोहलीनं टी२० विश्वचषकात यावेळी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. आयर्लंड, अमेरिका आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यांत विराट कोहलीला सूर गवसलेला नाही. कोहलीनं केवळ ५ धावा केल्या आहेत. विराट कोहलीला सलामी पाठवण्याऐवजी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवावं, असं मत देखील मांडलं जात आहे. नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये विराटने १५ मॅचमध्ये ७४१ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. पण, त्यानंतर तो चांगली सुरुवात करू शकलेला नाही. (T20 World Cup Virat Kohli)
शिवम दुबेला विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. शिवम दुबे म्हणाला, विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलणारा मी कोण आहे. जर विराटनं तीन मॅचमध्ये धावा केल्या नाहीत तर येत्या तीन मॅचेसमध्ये तीन शतकं करु शकतो. विराट कोहलीबाबत कोणी चर्चा करणार नाही, असं शिवम दुबे म्हणाला. शनिवारी कॅनडा विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ सुपर ८ साठी वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोसला रवाना होईल. (T20 World Cup Virat Kohli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community