- ऋजुता लुकतुके
अमेरिकन क्रिकेट संघाने आतापर्यंत या विश्वचषकात (T20 World Cup, WI vs USA) सगळ्याच संघांना तगडी लढत दिली होती. पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवल्यानंतर पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी १७६ धावा केल्या होत्या. पण, शेजारी वेस्ट इंडिजने त्यांना ब्रिजटाऊनमध्ये चारी मुंड्या चीत केलं. आधी अमेरिकन संघ २० षटकांत १२८ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर शाय होपच्या धडाक्यापुढे विंडिजने फक्त १०.५ षटकांतच १३० धावा पूर्ण केल्या. फक्त १ गडी गमावून. ९ गडी आणि ५५ चेंडू राखून विंडिजने हा सामना जिंकला. (T20 World Cup, WI vs USA)
(हेही वाचा- T20 World Cup, Ind vs Ban : बाद फेरीच्या दृष्टीने भारतासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा )
आतापर्यंत स्पर्धेत प्रभावी ठरलेल्या सौरभ नेत्रावळकरला (Saurabh Netravalkar) या सामन्यात जोरदार मार पडला. कारण, होप आणि निकोलस पुरण यांनी सगळ्याच गोलंदाजांना षटकारांचा भरपूर प्रसाद दिला. होपने तर नाबाद ८२ धावा केल्या त्या ३९ चेंडूंत. त्याने अमेरिकेचं आव्हानच संपवलं. (T20 World Cup, WI vs USA)
West Indies get their first win of the Super Eight stage and boost their net run rate 🙌#T20WorldCup | #USAvWI | 📝 https://t.co/Uq20b7LgVQ pic.twitter.com/D4jcpuMnNY
— ICC (@ICC) June 22, 2024
होपने आणि निकोलस पुरणने मिळून ११ षटकार ठोकले. यातील होपचे ८. त्यापूर्वी अमेरिकन फलंदाजीला सुरुंग लावला तो जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आणि रोस्टन चेज (Roston Chase) यांनी. आंद्रियास गॉस (Andreas Gauss) आणि नितिश कुमार (nitish kumar) यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेली ४८ धावांची भागिदारी ही अमेरिकन डावाची एकमेव जमेची बाजू होती. बाकी सगळे फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. एकामागून एक फलंदाज तंबूत परतत होते. अमेरिकन डाव १९.५ षटकांत १२८ धावांत गुंडाळला गेला. (T20 World Cup, WI vs USA)
(हेही वाचा- भाजपाची रणनिती ठरली, विधानसभेआधी मोठे बदल होणार? Chandrasekhar Bawankule म्हणाले…)
रोस्टन चेजने ४ षटकांत १९ धावा देत ३ बळी मिळवले. तर आर्चरने ३१ धावांत ३ बळी टिपले. रोस्टन चेजला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी भेदक ठरली. या पराभवानंतर अमेरिकेचं सुपर ८ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या बरोबरीने २ गुण मिळवत आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. आता वेस्ट इंडिजचा पुढील सामना सोमवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तो बाद फेरीसाठी निर्णायक ठरेल. (T20 World Cup, WI vs USA)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community