T20 World Record : ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत चोपल्या ११३ धावा, टी-२० तील अनेक विक्रम धारातीर्थी

स्कॉटलंड विरुद्ध ट्रेव्हिस हेडने १७ चेंडूंत अर्धशतक झळकावलं.

150
T20 World Record : ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत चोपल्या ११३ धावा, टी-२० तील अनेक विक्रम धारातीर्थी
T20 World Record : ऑस्ट्रेलियाने ६ षटकांत चोपल्या ११३ धावा, टी-२० तील अनेक विक्रम धारातीर्थी
  • ऋजुता लुकतुके

स्कॉटलंडच्या एडिंबरो इथं झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड हा पहिला टी-२० सामना विक्रमांसाठीच (T20 World Record) लक्षात राहील. कारण, ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांत तब्बल ११३ धावा कुटल्या. आणि त्या जोरावर विजयासाठी समोर असलेलं १५५ धावांचं लक्ष्यही ९.४ षटकांतच पार केलं. . प्रथम फलंदाजी करताना स्कॉटलंडने निर्धारित २० षटकांत १५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ६२ चेंडू आणि ७ गडी राखून विजय मिळवला. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) अवघ्या २५ चेंडूत ८० धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियासाठी जोरदार पाऊस पाडला. तसेच मिचेल मार्शने (Mitchell Marsh) देखील ३९ धावांची आक्रमक खेळी केली.

पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यजमान संघाकडून सर्वाधिक धावा जॉर्ज मुनसेने २८ धावा केल्या. तर संघाचा कर्णधार रिची बेरिंग्टनने २३ आणि मॅथ्यू क्रॉसने ३७ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा सलामीवर जेक फ्रेझर मॅकगर्कला चांगली खेळी करता आली आहे. जेक फ्रेझर मॅकगर्क झटपट बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि मिचेल मार्शने (Mitchell Marsh) आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड (Travis Head) आणि मिचेल मार्शने (Mitchell Marsh) चौकर-षटकारांचा पाऊस पाडला. स्कॉटलंडने दिलेल्या १५५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ५८ चेंडूतच पूर्ण केले.

(हेही वाचा – Bus Accident : कोकणात जाणाऱ्या दोन बसचा कशेडी घाटात अपघात; जीवितहानी नाही)

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या तिसऱ्या चेंडूवर जेक फ्रेझर मॅकगर्कची विकेट पडली. यानंतर मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी कमान सांभाळली. या दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या अवघ्या ६ षटकांत ११३ धावांवर नेली. टी२० आंतरराष्ट्रीय (T20 World Record) सामन्यातील पॉवरप्लेमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. मिचेल मार्च पॉवरप्लेनंतर पुढच्याच चेंडूवर ३९ धावा करत बाद झाला.

(हेही वाचा – मंत्री अब्दुल सत्तार Manoj Jarange यांच्या भेटीला; रात्री उशिरापर्यंत चर्चा)

ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) या सामन्यात १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत तो आता मार्कस स्टॉइनिसच्या बरोबरीत पोहोचला. ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) २५ चेंडूत ८० धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने १२ चौकार आणि ५ षटकार टोलावले. दुसरीकडे, मिचेल मार्शने (Mitchell Marsh) आपल्या डावात केवळ १२ चेंडूंचा सामना केला. मात्र या छोट्या खेळीत मिचेल मार्शने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. (T20 World Record)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.