T20WorldCupFinal: विश्वचषकातील दिमाखदार विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…

89
T20WorldCupFinal: विश्वचषकातील दिमाखदार विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…
T20WorldCupFinal: विश्वचषकातील दिमाखदार विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन; म्हणाले…

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर (T20WorldCupFinal) नाव कोरलं आहे. सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-२० चॅम्पियन ठरला आहे. दरम्यान, या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन करत व्हिडीओ संदेश जारी केला आहे. (T20WorldCupFinal)

पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

“भारतीय संघाला मिळालेल्या भव्य विजयासाठी मी संपूर्ण देशवासियांकडून त्यांचं अभिनंदन करतो. १४० कोटी देशातील जनतेला त्यांच्यावर गर्व आहे. हा एक ऐतिहासिक विजय आहे. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याबरोबरच संपूर्ण देशवासियांची मने जिंकली आहेत.” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली. तसेच “हा विश्वचषक एका विशेष कारणामुळेही लक्षात ठेवला जाईल. ते म्हणजे या स्पर्धेत इतके सगळे देश सहभागी झाले होते. मात्र, भारतीय संघाचा एकाही सामन्यात पराभव झाला नाही. संपूर्ण स्पर्धेत अजेय राहणं ही छोटी गोष्ट नाही.” असेही ते म्हणाले. (T20WorldCupFinal)

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला. (T20WorldCupFinal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.