Taekwondo World Championships : तायक्वांडोच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या खर्चासाठी या राष्ट्रीय खेळाडूचं क्राऊड फंडिंगचं आवाहन 

35
Taekwondo World Championships : तायक्वांडोच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या खर्चासाठी या राष्ट्रीय खेळाडूचं क्राऊड फंडिंगचं आवाहन 
Taekwondo World Championships : तायक्वांडोच्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या खर्चासाठी या राष्ट्रीय खेळाडूचं क्राऊड फंडिंगचं आवाहन 
  • ऋजुता लुकतुके 

पुढील महिन्यात हाँगकाँग इथं होणाऱ्या तायक्वांडो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील सावरकर तायक्वांडो अकादमीतील ४ जणांची निवड झाली आहे. भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान या चौघांना मिळणार आहे. यातील १२ ते १४ वयोगटात रुद्र खंदारे, काव्य धोडायानार आणि कियान देसाई या तीन मुलांची तर या मुलांचे प्रशिक्षक आणि अनुभवी तायक्वांडोपटू राजेश खिल्लारी हे मास्टर्स गटात ही स्पर्धा खेळणार आहेत. पण, खिल्लारी यांच्यासमोर आव्हान आहे ते स्पर्धेच्या सहभागासाठी लागणाऱ्या पैशाचं. तिथलं १०० हाँगकाँग डॉलरचं प्रवेश शुल्क, राहण्या जेवणाचा खर्च आणि विमानाचं तिकीट मिळून प्रत्येकी २ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि राजेश खिल्लारी यांची त्यासाठीच सध्या जुळवाजुळव सुरू आहे. (Taekwondo World Championships)

(हेही वाचा- Zeeshan Siddique यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश; वांद्रे पूर्वची उमेदवारी)

‘एका खेळाडूला खेळाकडे लक्ष देण्याबरोबरच ही अशी धावपळ करावी लागते ही भारतातील वस्तुस्थिती आहे. आणि दिवसात सकाळी ६ वाजता सराव सुरू करून साडे आठ वाजेपर्यंत सराव आणि अकादमी अशी दुहेरी कसरत करत असतानाच पैशाची जुळवाजुळवही करायची हे आव्हान म्हणजे तारेवरील कसरत आहे. है पैसे जमा झाले नाहीत तर मी आतापर्यंत घेतलेली मेहनत वाया जाणार आहे,’ असं म्हणत राजेश खिल्लारी यांनी यावेळी क्राऊंड फंडिंगचा पर्याय तपासून पाहायचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी makeachamp या पोर्टलवर आपलं प्रोफाईल तयार केलं आहे. आणि लोकांकडून आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. (Taekwondo World Championships)

Insert link – https://makeachamp.com/rajeshkhilari

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावकर यांनीही क्रीडाप्रेमींना राजेश खिल्लारींना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. राजेश खिल्लारी हे आंतरराष्ट्रीय तायक्वांडोपटू असून त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत पदकंही मिळवली आहेत. आताही आशियाई विजेतेपद स्पर्धेसाठी त्यांची झालेली निवड ही राष्ट्रीय स्तरावर झालेल्या विविध चाचणी प्रक्रियेतून गेल्यावरच झाली आहे.  (Taekwondo World Championships)

(हेही वाचा- Ajit Pawar गटाची दुसरी यादी जाहीर; सना मलिक यांना अणुशक्तीनगर पूर्वची उमेदवारी)

राजेश खिल्लारी आणि त्यांच्या ३ प्रशिक्षणार्थींनी मागच्या काही महिन्यात देशभरात झालेल्या विविध राष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीवरून भारतीय संघासाठी खेळाडूंची निवड झाली आहे. मुलांनी कानपूर, उत्तर प्रदेश इथं झालेल्या स्पर्धेत अव्वल कामगिरी करत आपलं राष्ट्रीय संघातील स्थान भक्कम केलं. तर राजेश खिल्लारी कटक, ओरिसा इथं झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल ठरले होते. त्याचबरोबर नाशिकच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेतही या सगळ्यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावलं आहे. (Taekwondo World Championships)

नवी दिल्लीतील राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा आटोपून ते नुकतेच मुंबईत परतले आहेत. ‘मी पहाटे ४ वाजता उठून साडेपाचला माझा तायक्वांडोचा सराव सुरू करतो. ६ ते साडेआठ, मग पुन्हा १०.३० ते दीड आणि दुपारी ४.३० ते ८.३० या वेळात मी माझा स्वत:चा सराव आणि अकादमीतील मुलांना द्यायचं प्रशिक्षण यात व्यस्त असतो. माझा सगळा वेळ मी तायक्वांडो खेळाला दिला आहे. आणि आता पैशांअभावी आंतरराष्ट्रीय संधी जाऊ नये एवढीच इच्छा आहे,’ असं खिलारी यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितलं. (Taekwondo World Championships)

(हेही वाचा- आमचे फटाके २३ नोव्हेंबरला फुटणार;  Amit Thackeray नी व्यक्त केला विश्वास)

हाँगकाँगला ३० नोव्हेंबरपासून आशियाई अजिंक्यपद स्पर्धा भरणार आहे. आणि त्यापूर्वी आर्थिक जुळवाजुळव करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. सावरकर अकादमीतील ४ जणांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आणि एकाच अकादमीतून ४ जणांची निवड होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. (Taekwondo World Championships)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.