राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी जाणाऱ्या भारतीय युवा टेबल टेनिस खेळाडूचा अपघातात मृत्यू!

90

तामिळनाडूचा टेबल टेनिसपटू दीनदयालन विश्वचा मेघालयमध्ये अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात त्याचे तीन साथीदार जखमी झाले. रविवार, 17 एप्रिल रोजी, 18 वर्षीय दीनदयालन आणि तामिळनाडूतील इतर तीन टेनिसपटू 83व्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी गुवाहाटी विमानतळावरून शिलाँगला टॅक्सीने जात असताना हा अपघात झाला.

ट्रकने कारला धडक दिली

रि-भोई जिल्ह्यात विरुद्ध दिशेने येणाऱ्या 12 चाकी ट्रकने (ट्रेलर) चार खेळाडू प्रवास करत असलेल्या कारला धडक दिली. डिव्हायडर ओलांडत असताना ट्रक कारला धडकला. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या निवेदनानुसार, कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. या चारही खेळाडूंना नोंगपोह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेत असताना दीनदयालनचा वाटेतच मृत्यू झाला.

( हेही वाचा: आता कारवाईचा वाजणार भोंगा! परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई )

इतरांची प्रकृती स्थिर

दीनदयालनचे सहकारी संतोष कुमार, अविनाश प्रसन्नजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हे गंभीर जखमी झाले असले, तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना शिलाँग येथील नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.