काय सांगताय! आता BCCI आणखी होणार मालामाल!

भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा. टाटा समूहाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. चिनी मोबाईल कंपनी विवोची जागा घेत टाटा समूह आयपीएलचं नवं टाइटल स्पॉन्सर बनला आहे. टाटा समूहाच्या एन्ट्रीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणखी मालामाल म्हणजेच श्रीमंत होणार आहे. टाटा समूहाने आयपीएलशी टायटल स्पॉन्सर म्हणून दोन वर्षांचा करार केला आहे. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, टाटा समूह बीसीसीआयला दोन्ही वर्षांसाठी सुमारे 670 कोटी रुपये देणार असून विवो टर्मिनेशन म्हणून 454 कोटी रुपयेही देणार आहे. अशाप्रकारे बीसीसीआयला पुढील दोन वर्षांत 1124 कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

असा मिळाला IPL ला नवा स्पॉन्सर

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला 2022 च्या हंगामात 547 कोटी रुपये तर 2023 च्या हंगामात 577 कोटी रुपयांचा नफा होणार आहे. दरम्यान विवोने 2022 मध्ये 484 कोटी रुपये टायटल स्पॉन्सर म्हणून आणि 2023 सीझनसाठी 512 कोटी रुपये देण्याचे सांगितले होते मात्र यात बीसीसीआयला जास्त फायदा झाला नाही. विवोने 2018-2022 साठी 2200 कोटी रुपयांचा करार केला होता, परंतु 2020 मध्ये गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्यादरम्यान झालेल्या संघर्षानंतर विवोला एका वर्षासाठी वगळण्यात आले होते. मग ड्रीम-11 ला ही स्पॉन्सरशिप मिळाली. यानंतर, विवोला एका वर्षासाठी मागील हंगामात परत आणण्यात आले. आता विवोसोबतचा करार संपला आहे. अशा परिस्थितीत टाटा समूहाच्या रूपाने आयपीएलला नवा टायटल स्पॉन्सर मिळाला.

(हेही वाचा –मुंबईसह महाराष्ट्रावर होणार हल्ला? यंत्रणांच्या हाती लागलं संभाषण)

दोन्ही हंगामात एकूण 1124 कोटींची होणार कमाई 

टाटा समूह बीसीसीआयला प्रति हंगाम 335 कोटी रुपये देणार असल्याने एकूण 670 कोटी रुपयांची कमाई होणार आहे. तर विवोने स्वतः या टायटल स्पॉन्सरमधून माघार घेण्याचे ठरवले होते. अशा परिस्थितीत त्याला 2022 मध्ये 183 कोटी रुपये आणि 2023 च्या हंगामात 211 कोटी रुपये टर्मिनेशन फी म्हणून भरावे लागतील. याशिवाय, प्रत्येक हंगामात 6% असाइनमेंट फी देखील भरावी लागेल. जे 2022 मध्ये 29 आणि 2023 च्या हंगामात 31 कोटी रुपये असणार आहे. आशा प्रकारे बीसीसीआयला दोन्ही हंगामात एकूण 1124 कोटींची कमाई होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here