इथोपियाचा हायले लेमी ठरला मुंबई मॅरेथॉनचा विजेता

मुंबई मॅरेथॉन कायम चर्चेत येत असते, या मॅरेथॉनमध्ये जगभरातून स्पर्धक सहभागी होत असतात. यावेळी विजेता होणाऱ्या स्पर्धकाचा मान उंचावत असतो. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये इथोपियाचा हायले लेमी हा मुंबई मॅरेथॉनचा विजयी ठरला आहे.

कोण कोण जिंकले? 

दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर रविवार, १५ जानेवारी रोजी टाटा मॅरेथॉन पार पडली, त्यामध्ये जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेल्या ‘मुंबई मॅरेथॉन’चे यंदा १८वे वर्ष आहे. हायले लेमीने टाटा मुबई पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे तर, एलिट भारतीय विजेता गोपी.टी ठरला आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे ५.१५ वाजता सुरुवात झाली. ४२.१९७ किलोमीटरच्या या मॅरेथॉनमध्ये ५५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये मॅरेथॉन पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉन स्पर्धेस सुरूवात झाली, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू झाली. टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये इथोपियाचा धावपटू हायले लेमी याने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्याने २ तास ०७ मिनिटे २८ सेंकदात मॅरेथॉन पूर्ण केली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर (केनिया) फिलेमन रोनो, २ तास ८ मिनिटे ४४ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावर हेलू झेदू इथोपिया २ तास १० मिनिटे २३ सेकंद, अशी विजेत्यांची नावे आहेत.

(हेही वाचा समृद्धी महामार्गावर विक्रमी टोलवसुली! महिन्याभरात साडेतीन लाखांहून अधिक वाहनांनी केला प्रवास)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here