-
ऋजुता लुकतुके
नेदरलँड्समध्ये झालेल्या प्रतीष्ठेच्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत अखेर भारताच्या प्रग्यानंदाने टायब्रेकरवर डी गुकेशचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. निर्धारित १४ डावांमध्ये दोघांचीही ८.५ अशी बरोबरी होती. त्यामुळे टायब्रेकचा मार्ग अवलंबावा लागला. दोघांनीही निकराचे प्रयत्न केले. पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धेत अलीकडेच जगज्जेता ठरलेला डी गुकेश जलद बुद्धिबळ लढतीत थोडासा गोंधळतो. तेच इथंही दिसून आलं. आणि जगज्जेतेपदानंतर त्याला पहिला पराभव इथं स्वीकारावा लागला. प्रग्यानंदने २-१ अशी टायब्रेकरमध्ये बाजी मारली. (Tata Steel Chess 2025)
(हेही वाचा- Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी)
🚨 BREAKING: Praggnanandhaa R wins the 2025 Tata Steel Masters! 🏆♟️
A stunning performance in Wijk aan Zee crowns him champion! 🎉🔥
Congratulations, Pragg!! pic.twitter.com/Xt2Lnw6doq
— Tata Steel Chess Tournament (@tatasteelchess) February 2, 2025
अख्ख्या स्पर्धेत आक्रमक खेळ करणाऱ्या प्रग्या आणि गुकेशला स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत मात्र आश्चर्यकारकरित्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे दोघांचे साडेआठ गुण झाले. जर्मनीच्या व्हिंसेट किमरने प्रग्यानंदाला हरवलं. तर गुकेशला भारताच्याच अर्जुन एरिगसीने हरवलं. एरिगसीचा या स्पर्धेतील हा पहिलाच विजय ठरला. पण, दोघंही हरल्यामुळे गुण पुन्हा एकसमान राहिले. टायब्रेकही चुरशीचा झाला. पहिल्याच सामन्यात प्रग्यानंदाचा पराभव झाला. पण, त्याने दुसऱ्या डावांत पुनरागमन केलं. आणि काळे मोहरे घेऊनही त्याने विजय मिळवला. त्यानंतरची लढत ही वेळेची लढाई होती. कारण, गुकेशकडे फक्त २ तर प्रग्यानंदाकडे ३ मिनिटं शिल्लक होती. आणि अशावेळी गुकेशकडून एक चूक झाली आणि ती हेरत प्रग्यानंदाने सामन्यासह विजेतेपदही पटकावंल. (Tata Steel Chess 2025)
— Tata Steel Chess Tournament (@tatasteelchess) February 2, 2025
प्रग्यानंदाने पहिल्यांदाच ही मेजर स्पर्धा जिंकली आहे. तर गुकेश गेल्यावेळीही इथे उपविजेता ठरला होता. यावेळीही त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. गेल्यावर्षीही गुकेशला चीनच्या वाई यी बरोबर अंतिम फेरीत टायब्रेक खेळावा लागला होता. आणि त्यातच गुकेशचा पराभव झाला होता. (Tata Steel Chess 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community