Tata Steel Chess 2025 : टाटा स्टील स्पर्धेत प्रग्यानंदाने मिळवली आघाडी, अर्जुन एरिगसीचा तिसरा पराभव

Tata Steel Chess 2025 : स्पर्धेच्या ४ फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत.

24
Tata Steel Chess 2025 : टाटा स्टील स्पर्धेत प्रग्यानंदाने मिळवली आघाडी, अर्जुन एरिगसीचा तिसरा पराभव
  • ऋजुता लुकतुके

टाटा स्टील या प्रतीष्ठेच्या बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीनंतर भारताच्या आर. प्रग्यानंदाने एकट्याने आघाडी घेतली आहे. ४ सामन्यांतून त्याचे साडेतीन गुण झाले आहेत. तर भारताचा नंबर वन खेळाडू अर्जुन एरिगसीला अनपेक्षितपणे स्पर्धेत तिसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे त्याचे फक्त ०.५ गुण आहेत. मंगळवारी उशिरा झालेल्या सामन्यात अर्जुन एरिगसीच्याच कामगिरीची चर्चा होती. व्लादिमीर फेडोसीव विरुद्ध पांढरे मोहरे घेऊन खेळतानाही त्याचा पराभव झाला. (Tata Steel Chess 2025)

चांगल्या सुरुवातीनंतर पंधराव्या चालीत अर्जुनने आपलं वर्चस्व गमावलं. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्यालाही या चुकीचा फायदा मिळवता आला नव्हता. पण, अर्जुनने एक प्यादं मारताना घोडा पुढे रेटण्याची आणखी एक चूक केली. त्यामुळे फेडोसीवला राणी पुढे दामटवता आली आणि तिथेच अर्जुनचा पराभव स्पष्ट झाला. सामन्यात १० मिनिटं बाकी असतानाही मग अर्जुनने ३९ व्या चालीतच पराभव मान्य केला. (Tata Steel Chess 2025)

(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठाला खिंडार; ५० पदाधिकाऱ्यांचा BJP मध्ये प्रवेश)

दुसरीकडे प्रग्यानंदाने मात्र आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. ल्यूआन ल्युक मेंडोकाचा त्याने ४६ व्या चालीत पराभव केला. प्रतिस्पर्ध्याने पराभव मान्य केला तेव्हा प्रग्यानंदची डावातील अचूकता संगणकाच्या रेटिंगवर होती ९४ टक्के. त्याचा धडाकाच तसा होता. स्पर्धेत आतापर्यंत त्याने हरिकृष्णा, अर्जुन आणि आता मेंडोकाचा पराभव केला आहे. एकूण ४ सामन्यातील त्याचा हा तिसरा विजय होता. त्यामुळेच ३.५ गुणांसह तो एकट्याने अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. या विजयाबरोबर प्रग्यानंदने जागतिक फिडे रँकिंगमध्येही आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. (Tata Steel Chess 2025)

टाटा स्टील स्पर्धेत चौथ्या फेरीनंतर क्रमवारी – आर प्रग्यानंद (३.५ गुण), नोदिरबेक आब्दुस्तरोव (३ गुण), डी गुकेश, करुआना फाबियानो, व्लादिमीर फेडोसीव, विन्सेन्ट कीमर, पी हरिकृष्णा (सर्व २.५), वी यी, अलेक्सी सराना (सर्व २ गुण), अनिश गिरी (१.५ गुण), मॅक्स वॉर्मरडॅम, जॉर्डन व्हॅन फॉरिस्ट (१ गुण), लिऑन ल्युक मेन्डोन्का व अर्जुन एरिगसी (०.४ गुण) (Tata Steel Chess 2025)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.