भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी आहार व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी खेळाडूंनी काय खावे काय खाऊ नये, हे ठरवण्यात येते, मात्र यामध्ये नवीन प्रथा सुरु झाली आहे. खेळाडूंनी मांस खावे, पण डुकराचे खाऊ नये आणि जे मांस खाणार ते हलाल प्रमाणित असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय विश्व चषकानंतर घेतला निर्णय
नुकत्याच झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय विश्व चषक सामान्यांत भारतीय क्रिकेट संघाला उपांत्य पूर्व फेरीत जाता आले नाही. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. २००७ नंतर प्रथमच भारतीय संघाला या सामान्यांपासून मागे फिरावे लागले आहे. त्यानंतर संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड बनला आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा बनल्यानंतर खेळाडूंना ‘हलाल प्रमाणित’ मांस खाण्याची सक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे मांस खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
(हेही वाचा न्यूझीलंंडची आगामी विश्वचषकातून माघार)
खेळाडूंच्या आरोग्यासाठी निर्णय
येणाऱ्या आयसीसीच्या मालिकांसाठी खेळाडूंनी तंदुरुस्त असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकांच्या आधी खेळाडूंचे वजन वाढले जाऊ नये किंवा त्यांच्या तब्येतीत बिघाड होऊ नये, असा यामागील उद्देश आहे. कारण काही खेळाडूंना पोटाचे त्रास जाणवू लागले आहेत. दरम्यान हलाल प्रमाणित आहार ही संकल्पना धर्मा-धर्मात भेद निर्माण करत आहे. यामुळे मुस्लिम आणि बिगर मुस्लिम असा भेद निर्माण होतो.
हलाल प्रमाणित मांस म्हणजे काय?
- ‘हलाल’ शब्दाचा मुख्य वापर मांस मिळवण्यासाठी पशूहत्या करण्याच्या संदर्भात केला जातो.
- यात मुख्यतः कुर्बानी करणारा (कसाई) इस्लामी कायद्याचे पालन करणारा, म्हणजे मुसलमान असला पाहिजे.
- ज्या प्राण्याला हलाल करायचे आहे, तो निरोगी आणि सुदृढ असला पाहिजे.
- त्याला मोकळ्या वातावरणात ठेवले पाहिजे.
- त्याला मारतांना (जबिहा करतांना) अगोदर इस्लामी रितीनुसार ‘बिस्मिल्लाह अल्लाहू अकबर’ म्हटले पाहिजे.
- गळ्यावरून सुरी फिरवतांना त्या प्राण्याचे मुंडके मक्केतील काबाच्या दिशेने केलेले असले पाहिजे.
- त्यानंतर धारदार सुरीने प्राण्याची श्वासनलिका, रक्त वाहून नेणार्या धमन्या आणि गळ्याच्या नसा कापून त्या प्राण्याचे संपूर्ण रक्त वाहून जाऊ दिले पाहिजे.
- या प्राण्याला वेदना होऊ नयेत; म्हणून अगोदर विजेचा झटका देणे किंवा बधीर करणे निषेधार्ह मानले गेले आहे.
हलाल अर्थव्यवस्थेचा विश्वभरात दबदबा
पाश्चात्त्य देशांत हलाल करण्याला अमानवी मानले जाते, मात्र इस्लामनुसार हलाल मांसच ग्राह्य आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे आज गैरइस्लामी देशांतही ७० ते ८० टक्के मांस हे हलाल पद्धतीने; म्हणजे वरील निकषांचे पालन करूनच मिळवले जाते. केवळ मासे आणि समुद्रात मिळणारे जलचर यांच्यासाठी हलाल पद्धत आवश्यक नाही. सध्याच्या काळानुसार हलाल आणि हराम लक्षात येण्यासाठी सोपे नियम बनवण्याकडे कल आहे. भारतात केवळ १५ टक्के असणार्या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे, म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. आता तर हे हलाल प्रमाणपत्र केवळ मांसापुरते मर्यादित न राहता, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था, मॉल यांसाठीही चालू झाले. इस्लामिक देशांत निर्यात करणार्यांसाठी तर ‘हलाल सर्टिफिकेट (प्रमाणपत्र)’ बंधनकारकच बनले आहे. या हलाल अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका, म्हणजे २ ट्रिलीयन (१ ट्रिलीयन म्हणजे १ वर १२ शून्य – १००० अब्ज) डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे.
Join Our WhatsApp Community