भारतीय क्रिकेट संघासाठी २०२२ हे वर्ष फारसे चांगले गेले नाही कारण यावर्षी सुद्धा टीम इंडियाला ICC ट्रॉफीवर नाव कोरता आलेले नाही अशा परिस्थितीत BCCI आता पूर्णपणे सतर्क होऊन २०२३ साठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. BCCI ने पहिल्यांदा निवड समिती बरखास्त केली होती. तसेच डिसेंबर महिन्याच्या अखेरिस निवड समितीसाठी नवा अध्यक्ष नेमण्यात येणार आहे. टीम इंडिया सध्या बांगलादेशमध्ये मालिका खेळत आहे. बांगलादेश वनडे सिरिजमध्ये सुद्धा भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.
( हेही वाचा : बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समस्या अनेक… )
आता पुढील वर्षासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक BCCI ने जाहीर केलेले आहे. दरम्यान पुढील वर्षी भारतीय संघात महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत.
भारतीय संघाचे वेळापत्रक
- जानेवारी – श्रीलंकेविरुद्ध भारतीय मैदानावर एकदिवसीय सामने
- जानेवारी-फेब्रुवारी – न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर एकदिवसीय सामने
- फेब्रुवारी – मार्च – घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने
- जुलै- ऑगस्ट – घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामने
- सप्टेंबर – आशिया कप २०२३
- पाकिस्तानमध्ये २०२३ मध्ये आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. या स्पर्धेत अंतिम सामन्यासह १२ एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
- सप्टेंबर – ऑक्टोबर – घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामने
- ऑक्टोबर – नोव्हेंबर – वनडे विश्वचषकाचे भारतात आयोजन