आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२१च्या अंतिम सामन्यातून पृथ्वी, हार्दिकला डच्चू!

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. जरी या सामन्यांसाठी नव्या दमाच्या खेळाडूंची निवड केली तरी त्यात पृथ्वी शॉ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

येत्या जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशीप २०२१ मधील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारताचा संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सध्या आयपीएलमध्ये अव्वल कामगिरी करणारा मुंबईचा पृथ्वी शॉ, तसेच हार्दिक पंड्या यांना डच्चुन देण्यात आला आहे. विशेष म्हणजे इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटींसाठीही हाच असणार आहे.

बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. जरी या सामन्यांसाठी नव्या दमाच्या खेळाडूंची निवड केली तरी त्यात पृथ्वी शॉ नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

(हेही वाचा : वानखेडे, ब्रेबॉर्नवर होणार ड्राईव्ह ईन लसीकरण)

अशी आहे टीम इंडिया 

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी, ४ ते ८ ऑगस्ट
  • दुसरी कसोटी, १२ ते १६ ऑगस्ट
  • तिसरी कसोटी, २५ ते २९ ऑगस्ट
  • चौथी कसोटी, २ ते ६ सप्टेंबर
  • पाचवी कसोटी, १० ते १४ सप्टेंबर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here