Team India Champion : टी-२० जगज्जेत्यांवर जलाभिषेक, मिरवणुकीत खेळाडूंना खास टी-शर्ट

Team India Champion : भारतीय खेळाडू आणि चाहत्यांसाठीही हा दिवस संस्मरणीय ठरला.

138
Team India Champion : टी-२० जगज्जेत्यांवर जलाभिषेक, मिरवणुकीत खेळाडूंना खास टी-शर्ट
  • ऋजुता लुकतुके

वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक जिंकून मायदेशात परतलेल्या भारतीय संघासाठी बीसीसीआय आणि भारतीय चाहत्यांनी काही सरप्राईजेस आयोजित केली होती. नवी दिल्लीहून मुंबईला विमान उतरलं आणि भारतीय संघाला सलामी मिळाली ती जलाभिषेकाची. खेळाडूंना घेऊन येणाऱ्या विमानावर पाण्याचा जोरदार फवारा खेळाडूंच्या सन्मानार्थ मारण्यात आला. (Team India Champion)

खेळाडू त्यामुळे भारावलेले होते. कर्णधार रोहित शर्मा चषक उंचावतच विमानातून खाली उतरला. बाहेर येईपर्यंत त्याने तो हातात धरला होता. (Team India Champion)

यानंतर खऱ्या जल्लोषाला सुरुवात झाली. एनसीपीए ते वानखेडे मैदान अशी संघाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी बेस्टची एक खुली बस बाहेरून निळ्या रंगात रंगवण्यात आली होती. त्यावर स्पर्धेची काही संस्मरणीय छायचित्र कोरण्यात आली होती. या बसमधून खेळाडूंची शोभायात्रा एनसीपीए पासून वानखेडे स्टेडिअमपर्यंत काढण्यात आली. पाऊस असतानाही चाहते सकाळपासूनच मरिन ड्राईव्हवर जमले होते. (Team India Champion)

आणि खेळाडूंनी खास चॅम्पियन्स असं लिहिलेली जर्सी आजच्या दिवशी घातली होती. सत्कारासाठी वानखेडे स्टेडिअम चाहत्यांसाठी खुलं करण्यात आलं. तर पाचच मिनिटांत चाहत्यांनी ते भरून टाकलं. पाऊस असताना छत्र्या घेऊन लोक न कंटाळता उभे होते. (Team India Champion)

(हेही वाचा – Assembly Session : यंत्रमागधारकांना वीज अनुदानासाठी नोंदणीची अट रद्द)

प्रत्यक्ष सत्कार समारंभही अगदी उत्साहात पार पडला. खेळाडूंनी वानखेडे मैदानावर महाराष्ट्रीयन ढोलाच्या तालावर नाच केला. आयपीएलमध्ये याच मैदानावर हार्दिक पांड्याची लोकांनी हुर्यो उडवली होती. तिथे आज ‘हार्दिक, हार्दिक,’ असा जल्लोष सुरू होता. (Team India Champion)

या कार्यक्रमासाठी खेळाडूंनी घातलेल्या जर्सीवर दोन स्टार होते. यातील पहिला २००७ साली भारताच्या टी-२० संघाने मिळवलेल्या पहिल्या विजेतेपदासाठी. तर दुसरा स्टार या कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी. वानखेडे मैदानावर रोहित आणि विराट यांनी एकत्र चषक लोकांसमोर आणला. (Team India Champion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.