टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया (Team India) मायदेशात परतली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटल्यानंतर टीम इंडिया गुरूवारी मुंबईत येणार आहे. मुंबईत टीम इंडियाची भव्य व्हिक्ट्री परेड निघणार आहे. त्यामुळे आपल्या जगज्जेत्या खेळांडूचा भव्य सत्कार करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. याशिवाय उद्या टीम इंडियाच्या खेळाडूंचा विधानभवनातही सत्कार होणार आहे. यावेळी मुंबईकर खेळाडूंचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
(हेही वाचा –Hardik Pandya : आयसीसी क्रमवारीत हार्दिक पांड्या अष्टपैलू खेळांडूंमध्ये अव्वल )
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही माहिती दिली आहे. टीम इंडीयातील 4 खेळाडू मुंबईकर आहेत. हे चारही जण महाराष्ट्रातील आहेत. रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे. विधीमंडळ आवारात टीम इंडियातील खेळाडू येणार आहेत. त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या जगज्जेत्या खेळाडूंचा सत्कार केल्यावर इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या खेळाडूंनी देशाची मान उंचावली आहे. त्यामुळे या खेळाडूंचा आम्ही योग्य तो सन्मान करणार आहोत, असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. (Team India)
(हेही वाचा –T20 World Cup, India Champion : रिषभ पंतच्या व्हायरल पोस्टवर संघ सहकाऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया )
गुरूवारी पहाटे टीम इंडिया (Team India) दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व खेळाडूंनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. यानंतर मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडीअमपर्यंत स्वागत परेड काढली जाणार आहे. ओपन बस मधून ही परेड असेल. बीसीसीआयने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानंतर विधीमंडळातही या खेळाडूंचे स्वागत केले जावे अशी मागणी आमदारांनी लावून धरली. तर एका कार्यक्रमाचे आयोजन केले जावे अशी मागणी रोहित पवार यांनीही केली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याबाबत सरकारने विचार करावा असे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा देत मुंबईकर रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैयस्वाल यांचा सत्कार करणार असल्याचे स्पष्ट केले. (Team India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community