रोहितच्या चुका हार्दिकने सुधारल्या! टीम इंडियात झाले ३ मोठे बदल

भारतीय संघाने न्यूझीलंडचा रविवारी झालेल्या सामन्यात ६५ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या मॅच दरम्यान कर्णधार हार्दिक पंड्याने टीम इंडियामध्ये ३ महत्त्वाचे बदल केले आणि भारताचा विजय निश्चित झाला. वर्ल्डकपमध्ये कर्णधार रोहित शर्माने केलेल्या चुका हार्दिकने सुधारल्या आणि भारताला यश मिळाले.

( हेही वाचा : Investment Tips : पोस्टात ५ वर्षांत १३.९० लाखांचा परतावा; काय आहे ही सरकारी योजना)

युझवेंद्र चहलला प्लेअिंग ११ मध्ये संधी

वर्ल्डकपमध्ये चहलला खेळण्यास संधी दिली नाही म्हणून रोहित शर्माला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात आले होते. संपूर्ण विश्वचषकात त्याला संधी दिली गेली नाही. पण न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने चहलला संधी दिली आणि त्याने याचा चांगला उपयोग करत स्वत:ला सिद्ध केले. चहलने अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकांत २६ धावा देत २ बळी घेतले.

खेळाडूचा योग्य वापर

टी२० विश्वचषक २०२२ मध्ये कर्णधार रोहित शर्माने दीपक हुडाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केवळ एका सामन्यात संधी दिली परंतु त्याच्याकडून गोलंदाजी करून घेतली नव्हती. आता न्यूझीलंडविरुद्ध कर्णधार हार्दिक पंड्याने दीपक हुडाला संधी दिली आणि त्याने २.५ षटकांत १० धावा देत ४ बळी घेतले.

सलामी जोडीत बदल 

टी२० विश्वचषक २०२२ मध्ये रोहित शर्माने खराब फॉर्म असूनही केएल राहुलला संधी दिली. राहुलने प्रत्येक सामन्यात भारताला निराश केले. परंतु न्यूझीलंडविरुद्ध ही चूक दुरूस्त करत हार्दिकने ऋषभ पंतला ओपनिंगची संधी दिली. ऋषभ पंतसोबत ईशान किशानलाही त्याने सलामीची संधी देत भारताच्या सलामी जोडीत अपेक्षेनुसार बदल करण्यात आला. ईशान किशनने चांगली सुरूवात करत ३६ धावांची खेळी केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here