- ऋजुता लुकतुके
भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी नवी दिल्लीत परतला. सकाळीच खेळाडू व बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोक कल्याण मार्गावरील अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बीसीसीआयने आता पंतप्रधानांबरोबर खेळाडूंच्या झालेल्या गप्पांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात पंतप्रधान खेळाडूंशी गप्पा मारताना दिसतात. खुर्च्या पंतप्रधानांभोवती गोलाकार रचलेल्या दिसतात. (Team India Meets PM Modi)
A memorable occasion as #TeamIndia got the opportunity to meet the Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji in Delhi 🙌@narendramodi | @JayShah pic.twitter.com/eqJ7iv9yVw
— BCCI (@BCCI) July 4, 2024
‘एक संस्मरणीय भेट. टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाने पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली,’ असं बीसीसीआयने या व्हिडिओत म्हटलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह यावेळी संघाबरोबर हजर होते. मोदी यांनी कर्णधार रोहित शर्मा, स्टार खेळाडू विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची विशेष चौकशी केली. खेळाडूंनी यावेळी जर्सीवर चॅम्पियन अशी इंग्रजी ठळक अक्षरं असलेली नवीन जर्सी घातली होती. तर जर्सीवर दोन स्टार होते. एक स्टार २००७ साली जिंकलेल्या टी-२० चषकासाठी आणि दुसरा या कामगिरीच्या पुनरावृत्तीसाठी होता. (Team India Meets PM Modi)
(हेही वाचा – Team India Champion : टी-२० जगज्जेत्यांवर जलाभिषेक, मिरवणुकीत खेळाडूंना खास टी-शर्ट)
The triumphant Indian Cricket Team met with the Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji, at his official residence today upon arrival.
Sir, we extend our heartfelt gratitude to you for your inspiring words and the invaluable support you have provided to… pic.twitter.com/9muKYmUVkU
— BCCI (@BCCI) July 4, 2024
खेळाडूंनी गोलाकार बसून मोदींशी गप्पा मारल्या. यावेळी कर्णधार रोहित आणि विराट मोदींच्या उजव्या बाजूला बसले होते. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड डाव्या बाजूला बसले होते. ‘मोदीजी, तुमचे प्रेरणादायी शब्द व अमूल्य पाठिंब्यासाठी भारतीय संघ तुमचा ऋणी राहील,’ असा संदेश बीसीसीआयने या ट्विटला लिहिला आहे. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रमांक १ ची नमो लिहिलेली जर्सी प्रदान केली. (Team India Meets PM Modi)
(हेही वाचा – Team India Champion : टी-२० जगज्जेत्यांवर जलाभिषेक, मिरवणुकीत खेळाडूंना खा
हेही पहा –
Join Our WhatsApp Community