T20 World Cup : सेमीफायनल सामन्यात पराभूत होऊन सुद्धा, भारताला मिळाले ‘एवढ्या’ रुपयांचे बक्षीस!

162

टी-२० विश्वचषकात भारताचा सेमीफायनल सामन्यात पराभव झाल्यानंतर आता अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना रंगणार आहे. भारताविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवत इंग्लंडने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

( हेही वाचा : T20 World Cup: प्लेअर ऑफ टूर्नामेंटसाठी ९ नावे जाहीर! भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश, येथे करा VOTE)

टी-२० विश्वचषकातील विजेत्या संघाला १.६ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १३ कोटी मिळतील तर, रनरअप संघाला ०.८ मिलियन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय सेमीफायनलमध्ये बाहेर पडलेल्या दोन संघांना प्रत्येकी ०.४ मिलियन डॉलर आणि अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या आणि सुपर १२ टप्प्यात बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी ७० हजार डॉलर मिळतील.

भारताचा सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव झाला त्यामुळे भारतीय संघाला ०.४ मिलियन अमेरिकन डॉलर जवळपास ३.२६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.

बक्षीसांची संपूर्ण यादी…

संघ – बक्षीसे

  • विजेता – १.६ मिलियन डॉलर
  • उप-विजेता – ०.८ मिलियन डॉलर
  • सेमीफायनलमध्ये पराभूत झालेला संघ – ०.४ मिलियन डॉलर
  • सुपर-१२ मधून बाहेर पडणारा प्रत्येक संघ – ७० हजार डॉलर
  • पहिल्या फेरीतून बाहेर पडलेला संघ – ४० हजार डॉलर

दरम्यान, टी-२० विश्वचषकातून भारताचे आव्हान संपुष्टात आले असले तरीही ICC ने जाहीर केलेल्या प्लेअर ऑफ टूर्नामेंटच्या ९ खेळाडूंच्या यादीत भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोन दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

येथे करा व्होट
https://www.icc-cricket.com/awards/player-of-the-tournament

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.