Asia Cup 2023 : भारत – पाकिस्तान सामने होणार की नाही? जय शहांनी केली घोषणा

टीम इंडियाने २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला टी२० सामना जिंकत यंदाच्या वर्षाची विजयी सुरूवात केली. यंदाचे वर्ष भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण आशिया चषक, एकदिवसीय विश्वचषक यासारख्या स्पर्धा होणार आहेत. मात्र या स्पर्धेपूर्वीच भारत आणि पाकिस्तान या सामन्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी २०२३-२०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धांची यादी जाहीर केली आहे.

( हेही वाचा : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द; काय आहे कारण?)

जय शाह यांनी या संदर्भात ट्वीट केले असून सप्टेंबरमध्ये आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार आहेत. पाकिस्तान अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. परंतु आशिया कप २०२३ खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही असे जय शाह यांनी स्पष्ट केले आहे. आशिया चषक २०२३ मध्ये लीग टप्पा, सुपर ४ आणि फायनलमध्ये एकूण १३ सामने खेळवले जाणार आहे.

भारतीय संघ आशिया कपसाठी पाकिस्तानला जाणार नाही असे बीसीसीआयच्या सचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जर भारत पाकिस्तानात येणार नाही तर मुख्य वनडे विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान संघ भारतात जाणार नाही अशी विधाने पाकिस्तानकडून करण्यात आली.

परंतु जय शाह त्यांच्या निर्णयावर ठाम असून २००८ पासून भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला गेलेला नाही. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त आयसीसी आणि आशिया चषक असे सामने खेळवले जातात. द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here