-
ऋजुता लुकतुके
टी-२० विश्वचषकातील विजयानंतर विश्रांती घेत असलेले स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारतीय संघाबरोबर श्रीलंकेत पोहचले असून आगामी एकदिवसीय मालिकेसाठी त्यांनी सरावही सुरू केला आहे. श्रीलंकेबरोबरच एकदिवसीय मालिका २ ऑगस्टपासून सुरू होत आहे. आणि या मालिकेत दोघं खेळणार आहेत. मंगळवारी पल्लिकल इथं भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा शेवटचा टी-२० सामना पार पडेल. पण, त्यापूर्वी एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेले खेळाडू लंकेत दाखल झाले असून त्यांनी सराव सुरू केला आहे. (Team India)
Virat Kohli With Fans At Colombo Airport.😍🤍#ViratKohli #INDvSL #SLvIND @imVkohli pic.twitter.com/a5zFusYPT8
— virat_kohli_18_club (@KohliSensation) July 29, 2024
(हेही वाचा – Rohan Bopanna : पॅरिसमधील अपयशानंतर रोहन बोपान्नाची राष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती)
टी-२० विश्वचषकातील विजयानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांना एका महिन्याची विश्रांती मिळाली. आता तिघंही ताजेतवाने होऊन भारतीय संघात दाखल झाले आहेत. तर हर्षित राणा, श्रेयस अय्यर, के एल राहुल हे फक्त एकदिवसीय मालिकेसाठी निवड झालेले खेळाडू नव्याने लंकेत दाखल झाले आहेत. श्रेयस अय्यर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत शेवटची एकदिवसीय मालिका खेळला होता. त्यानंतर पाठीच्या दुखापतीमुळे तो बेजार होता. आणि बीसीसीआयने सांगूनही आयपीएलला प्राधान्य देऊन मुंबईकडून रणजी सामना न खेळल्यामुळे बीसीसीआयचा रोष त्याने ओढवून घेतला होता. बीसीसीआयने त्याचा मध्यवर्ती करार रद्द केला होता. (Team India)
आता ८ महिन्यांनंतर तो भारतीय संघात खेळणार आहे. एकदिवसीय संघ सध्या कोलंबोत आहे. इथंच प्रेमदासा स्टेडिअमवर एकदिवसीय मालिका होणार आहे. इथं सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरसोबत खेळाडू सराव करत आहेत. पहिला सामना २ ऑगस्टला झाल्यावर उर्वरित दोन सामने ४ आणि ७ ऑगस्टला होणार आहेत. (Team India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community