Team India चे भर पावसात क्रिकेटप्रेमींकडून स्वागत; वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सेलिब्रेशनची तयारी

189
भारत माता की जय…. मुंबईचा राजा रोहित शर्मा….वंदे मातरम… या घोषणांनी वानखेडे स्टेडियम दणाणून गेले होते. एकिकडे भारतीय संघ (Team India)  मुंबईत दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होता. पण दुसरीकडे मात्र वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी सजलेले आहे. आपल्या लाडक्या खेळाडूंसह वर्ल्ड कपला याची देही, याची डोळा पाहण्यासाठी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियम हाऊसफुल्ल करून सोडले.
मुंबईत जोरदार पाऊस पडायला लागला, काही चाहत्यांना याचा अंदाज होताच. पण वानखेडेमधील बऱ्याच चाहत्यांनी यावेळी रेन डान्सचा अनुभव घेतला. वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झाली. कारण चाहत्यांनी दुपारी २ वाजल्यापासून वानखेडे स्टेडियमच्या बाहेर रांगा लावल्या. आपल्याला हा सोहळा पाहता यावा, यासाठी चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवर जाणे पसंत केले. पण वानखेडे स्टेडियमवर गर्दी एवढी वाढली की, त्यानंतर पोलिसांना वानखेडे स्टेडियमचे गेट बंद करावे लागले. त्यानंतर निराश झालेल्या चाहत्यांनी मरिन ड्राइव्ह गाठले आणि तिथे ते भारतीय संघाच्या बसची वाट पाहत होते. पण जे चाहते वानखेडे स्टेडियममध्ये शिरण्यात यशस्वी ठरले, त्यांच्यासाठी हे क्षण अविस्मरणीय, असेच असतील. कारण कदी नव्हे ते वानखेडे स्टेडियमध्ये एवढे उत्साहाचे वातावरण होते. भारतीय चाहत्यांनी हा अनुभव १३ वर्षांनी अनुभवला. (Team India)
चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणी होती. कारण वर्ल्ड कप विजेता संघ (Team India) वानखेडेमध्ये दाखल होणार होता. यापूर्वी जेव्हा २०११ साली वर्ल्ड कप झाला होता. तेव्हा याच वानखेडे स्टेडियमवर फायनल झाली होती आणि चाहत्यांनी जीवाची मुंबई केली होती. त्यानंतर आता ही संधी मुंबईकरांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या संधीचा चांगलाच फायदा उचलला आहे. कारण मुंबईच्या चाह्तयांनी रस्त्यावर तर गर्दी केलीच, पण वानखेडे स्टेडियममध्ये अनोखा जल्लोष पाहायला मिळाला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.