मालिका जिंकल्यावर विराट-ईशान थिरकले; डान्सचा व्हिडिओ व्हायरल!

दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह भारताने टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकाही जिंकली आहे. दुसरा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ४ विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या विजयामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंमध्येही आनंदाचे वातावरण होते. विराट कोहली आणि ईशान किशन यांनी हा आनंद साजरा करताना मैदानातच डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

( हेही वाचा : बेस्टला आणखी ४५० कोटींची महापालिकेकडून आर्थिक मदत )

कोलकाता ईडन गार्डन्स मैदानात भारताने सामना जिंकल्यानंतर लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान विराटसह ईशानने डान्स केला. सध्या हा व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत असून क्रिकेटप्रेमी या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

डान्सचा व्हिडिओ व्हायरल

 

भारताचा विजय

दुसरी वनडे जिंकत भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या वनडेमध्ये श्रीलंकेच्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही रोहित शर्मा १७ तर शुभमन गिल २१ धावांवर बाद झाला. विराट कोहली सुद्धा लवकर बाद झाल्याने टीम इंडियाची स्थिती फारशी चांगली नव्हती त्यानंतर लोकेश राहूलने संघासाठी चांगली खेळी करत हार्दिक पंड्या सोबत चांगली भागिदारी केली. राहुलने १०३ बॉल्समध्ये ६४ रन्सची खेळी केली. यावेळी त्याने ६ चौकार मारले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here