Tennis Hall of Fame : लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश

लिअँडर पेसने दुहेरी आणि मिश्र दुहेरीची १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत.

363
Tennis Hall of Fame : लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश
Tennis Hall of Fame : लिअँडर पेस आणि विजय अमृतराज यांचा मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश
  • ऋजुता लुकतुके

लिअँडर पेसने दुहेरी आणि मिश्र दुहेरीची १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. तर विजय अमृतराज एकेकाळी एकेरीत वर्चस्व गाजवलेले टेनिसपटू आहेत. (Tennis Hall of Fame)

ऑलिम्पिक पदकविजेता लिअँडर पेस आणि माजी खेळाडू, समालोचक आणि प्रशिक्षक विजय अमृतराज यांचा बुधवारी टेनिसच्या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. आशियातून हा मान मिळवणारे दोघं पहिलेच पुरुष टेनिसपटू आहेत. त्याचबरोबर पत्रकार रिचर्ड इव्हान्स यांचाही समावेश हॉल ऑफ फेममध्ये झाला आहे. (Tennis Hall of Fame)

लिअँडर पेस सध्या ५० वर्षांचा आहे. दुहेरी आणि मिश्र दुहेरीची १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदं पेसच्या खात्यात जमा आहेत. भारताचा आतापर्यंतचा अव्वल टेनिसपटू असा लौकिक पेसने मिळवला आहे. तर विजय अमृतराज यांनी टेनिसच्या जागतिक क्रमवारीत १८ वं स्थान मिळवलं होतं. एखाद्या भारतीय टेनिसपटूने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. विम्बल्डन आणि फ्रेंच ओपनच्या उपउपांत्य फेरीपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. (Tennis Hall of Fame)

सध्या दोघांच्या हॉल ऑफ फेम समावेशाची घोषणा करण्यात आली आहे. पण, त्यांच्या समावेशाचा सोहळा २० जून २०२४ ला अमेरिकेत न्यूपोर्ट इथं होणार आहे. ऱ्होड आयलंडमध्ये टेनिस हॉल ऑफ फेमची सुरुवात झाली ती १९५५ साली. तेव्हापासून दरवर्षी एक खेळाडू, एक खेळासाठी योगदान दिलेली व्यक्ती आणि एक पत्रकार यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जातो. (Tennis Hall of Fame)

लिअँडर पेसने याच वर्षी वयाची पन्नास वर्षं पूर्ण केली आहेत. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा या सन्मानासाठी होतच होती. (Tennis Hall of Fame)

(हेही वाचा – Sikkim Snowfall : सैन्याकडून ८०० पर्यटकांची सुटका; राजधानी गँगटोकला आणण्यास सुरूवात)

मीडियातील व्यक्तींनी दिलेली मतं, हॉल ऑफ फेमचे सदस्य, खेळातील तज्ज आणि चाहत्यांची मतं एकत्र करून दरवर्षी कुणाला हा मान दिला जाणार हे ठरवलं जातं. यंदा लिअँडर पेसची खेळाडू म्हणून तर खेळासाठी योगदान दिलेली व्यक्ती म्हणून विजय अमृतराज यांचीही निवड झाली आहे. (Tennis Hall of Fame)

यापूर्वी २०१९ मध्ये चीनची दोनवेळा एकेरी ग्रँडस्लॅम विजेती लि ना हिचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये झाला होता. हा मान मिळवणारी ती पहिली आशियाई टेनिसपटू ठरली होती. (Tennis Hall of Fame)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.