चाहत्यांना धक्का! तिने घेतली २५ व्या वर्षी निवृत्ती

130

जगातील अव्वल क्रमांकाची ऑस्ट्रेलियाची महिला टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. अ‍ॅश्ले बार्टीने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठ्या धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार खेडाळूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत टेनिसला अलविदा केले आहे.

अ‍ॅश्ले बार्टीची कारकीर्द

करिअरच्या शिखरावर असताना अ‍ॅश्ले हीने हा धक्कादायक निर्णय घेतला. यापूर्वी अ‍ॅश्ले बार्टीने २०१४ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी अ‍ॅश्ले हिने टेनिसमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला होता. यानंतर ती क्रिकेटकडे वळली, क्रिकेटमध्ये सुद्धा उत्कृष्ट कामगिरी करत अ‍ॅश्लेने आपली चमक दाखवली होती. मात्र, २०१६ मध्ये ती पुन्हा टेनिसमध्ये परतली आणि २०१७ मध्ये तिने मलेशियन ओपनच्या रूपाने पहिले WTA विजेतेपद जिंकले. अ‍ॅश्ले बार्टी सध्या जगातील नंबर १ टेनिसपटू आहे. अशात तिचा टेनिस सोडण्याचा निर्णय धक्का देणारा आहे. ती सलग ११४ आठवडे जगातील अव्वल टेनिसपटू राहिली असून सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहणारी ती जगातील चौथी खेळाडू आहे.

( हेही वाचा : आधार कार्ड व्हेरिफिकेशनसाठी हे आहेत नवे नियम! )

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षापर्यंत क्रिकेट, टेनिस असा दोन्ही प्रवास करणाऱ्या अ‍ॅश्ले बार्टीने टेनिसमधून निवृत्त होताना मला वेगळी स्वप्ने खुणावर असल्याचे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.