- ऋजुता लुकतुके
भारतात निवडक ५ ते ६ केंद्रांमध्येच कसोटी सामने भरवण्यात यावेत का, हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यासारख्या विकसित देशांमध्ये अशीच पद्धत आहे. अलीकडेच भारतात एका कसोटीत फक्त अडीच दिवसांचा खेळ होऊ शकला. पावसामुळे बाकीचे दिवस वाया गेले. पण, यात महत्त्वाचं म्हणजे कानपूरच्या ग्रीनपार्कमध्ये झालेल्या या सामन्यात पावसानंतर खेळ वेळेवर सुरू करण्यासाठी तिथली यंत्रणा सक्षम नव्हती.
मैदानात पाण्याचं तळ साठलेलं असताना पाणी शोषून घेणारे फक्त दोनच पंप मैदानात होते. आऊटफिल्ड पावसापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी कव्हर्स नव्हती. अशावेळी संघातील स्टार खेळाडू विराट कोहलीने २०१९ मध्ये मीडियाशी बोलताना केलेलं एक विधान पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. तेव्हा विराट संघाचा कर्णधार होता. ‘भारतात ठरावीक ५ मैदानांवरच कसोटी क्रिकेट खेळवलं गेलं पाहिजे. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी कुठलंही मैदान चालेल. पण, कसोटी मैदानांशी पाहुणा संघही पुरेसा परिचित असलेला बरा,’ असंच मत विराटने तेव्हा व्यक्त केलं होतं. (Test Match Centers in India)
(हेही वाचा – Ayushman Bharat योजनेअंतर्गत ५०० कोटींचे देयक पंजाब सरकारकडे थकीत! रुग्णालयांची न्यायालयात धाव)
Virat said this back in 2019. https://t.co/SB9E2qFvXA pic.twitter.com/X8WzqNdZzF
— Aditya Saha (@Adityakrsaha) February 13, 2023
सध्याचा कर्णधार रोहित शर्माने मात्र विराटशी फारकत घेणारं मत मांडलं आहे. ‘कसोटी क्रिकेट हे मूलभूत क्रिकेट आहे. आणि ते लोकप्रिय करायचं असेल तर देशाच्या कानाकोपऱ्यात ते खेळलं गेलं पाहिजे. इंदूर आणि धरमशालातील लोकही कसोटी क्रिकेट राहू शकतात याचा मला आनंद आहे. त्यानेच कसोटी क्रिकेटचा प्रसार होईल,’ असं रोहित म्हणाला. भारतात सगळ्या कसोटी मैदानांवर प्रेक्षकांची चांगली गर्दी होते याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं.
स्टार अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनलाही रोहितचं म्हणणं पटतं. ‘भारतासारख्या देशात कानाकोपऱ्यातून क्रिकेटपटू तयार करायचे असतील तर त्यांच्यासमोर कसोटी क्रिकेट दिसलंही पाहिजे, त्यांनी मोठ्या खेळाडूंना खेळताना पाहिलं पाहिजे. त्यामुळे देशातच ठरावीक कसोटी केंद्र असणं हे मला फारसं हितावह वाटत नाही,’ असं सुरुवातीला अश्विन म्हणतो. त्यानंतर विराटच्या मुद्यापाशीही तो काही काळ घुटमळतो.
(हेही वाचा – Mahavitaran Bill : अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीजेचे दर चढे; ग्राहक नाराज)
‘ऑस्ट्रेलियाने ठरावीक केंद्र विकसित करण्याविषयी चांगलं उदाहरण समोर ठेवलं आहे. तिथे मोठा देश असूनही आपण ठरावीक मैदानातच खेळतो. कॅनबेराला तुम्ही क्रिकेट खेळत नाही. पाहुण्या संघांनाही या मैदानांची आात नीट माहिती झाली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटचा दर्जा सुधारतो. आपल्याकडे असं काहीतरी होऊ शकतं का, असा विचारही मला मनात येतो. ठरावीक मैदानांवर लक्ष केंद्रित केलं तर कसोटी क्रिकेटसाठी ते योग्य असेल,’ असं अश्विन म्हणाला. सध्या भारतात रोटेशन म्हणजे आळीपाळीने कसोटी सामने राज्य संघटनांना आयोजनासाठी दिले जातात. दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांचा कार्यक्रम एकत्र ठरतो. (Test Match Centers in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community