कोहलीच्या चिमुकलीला धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या!

भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कपमध्ये साजेशी कामगिरी न केल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या पराभवासाठी अनेक जणांनी मोहम्मद शमीला दोषी ठरवले. यावर विराटने शमीची पाठराखण केल्यामुळे सोशल मिडीयावरून विराटच्या चिमुकलीला अत्याचाराची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाची दखल दिल्ली महिला आयोगाने घेतल्यावर अखेर या विकृताला बेड्या पडल्या आहेत. सोशल मिडीया द्वारे खेडाळूंच्या कुटुंबाला धमक्या दिल्यामुळे अनेक दिग्गजांनी या प्रकरणी खेद व्यक्त केला आहे.

आरोपीला अटक

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने धमकी देणा-या आरोपीला हैद्राबादमधून केली अटक केली आहे. रामनागेश अलीबथीनी असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी उच्चशिक्षित असून, त्याने बी टेक केल आहे. स्वीग्गीमध्ये सॉफ्टवेअर म्हणून त्याने याआधी काम केलेलं आहे. दरम्यान, या विकृत कृत्याबद्दल आरोपीला सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा: १२ हजार वसूल करण्यासाठी गेली अन् पोलीस ठाण्यात असे घडले…)

काय आहे प्रकरण

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभव जिव्हारी लागल्यानंतर काही धर्मांधांनी सोशल मीडियावरून मोहम्मद शमीला लक्ष्य केले. विराट कोहली व संपूर्ण भारतीय संघाने शमीची पाठराखण केली, यामुळेच काही माथेफिरूंनी विराट व त्याच्या कुटुंबीयांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या दिल्या. यात विराटच्या दहा महिन्याच्या चिमुकलीला असभ्यपणे लक्ष्य केले गेले. महिला आयोगाने याची दखल घेत तक्रार दाखल केली होती. अखेर आरोपीला सायबर गुन्हे शाखेकडून अटक झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here