-
ऋजुता लुकतुके
एकेकाळी ॲशेसला कसोटी क्रिकेटमध्ये जे महत्त्व होतं, ते हळू हळू बोर्डर – गावसकर मालिकेला (Border – Gavaskar Trophy) येऊ लागलं आहे. आणि मैदानावर पाहायला मिळणारी चुरस प्रेक्षकांनाही खेचून आणत आहे. यंदाच्या मालिकेत मेलबर्नच्या १.२ लाख प्रेक्षक क्षमतेच्या मैदानावर विक्रमी ४ लाख लोकांनी कसोटी पाहण्यासाठी गर्दी केली होती. ही गर्दी पाहूनच माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगने वक्तव्य केलं की, ‘बोर्डर – गावसकर मालिका (Border – Gavaskar Trophy) ही सध्याची सर्वोत्तम कसोटी मालिका आहे.’
यंदा या मालिकेत भारताचा १-३ ने पराभव झाला. आणि चषक १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडे गेला. पण, कसोटी रंगतदार झाल्या आणि ऑस्ट्रेलियाने सातत्यपूर्ण कामगिरीने यात बाजी मारली. मालिका संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीचा अभ्यास करून सामने जिंकून देण्याची क्षमता, सातत्य, आक्रमकता आणि मालिकेतील कामगिरी यांच्या जोरावर बोर्डर – गावसकर मालिकेतील (Border – Gavaskar Trophy) सर्वोत्तम अकरा जणांचा संघ बघूया,
(हेही वाचा – Earthquake: नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; भारतातील ‘या’ राज्यांना ही जाणवले हादरे)
यशस्वी जयस्वाल (सलामीवीर) – यशस्वी जयस्वालने १० डावांमध्ये ४३ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या. त्याचा हा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा होता. आणि इतर भारतीय फलंदाजांच्या मानाने यशस्वीने कायम चांगली सुरुवात केली. आणि मालिकेत १ शतक आणि २ अर्धशतकं ठोकली. पर्थ कसोटीतील १६१ धावा ही या मालिकेतील एक नितांत सुंदर खेळी होती.
के एल राहुल (सलामीवीर) – या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांची कामगिरी सातत्यपूर्ण नव्हती. त्या तुलनेत यशस्वी आणि सलामीला खेळताना के एल राहुलही जबाबदारीने खेळत होते. सलामीला खेळताना पहिल्याच कसोटीत त्याने २६ आणि ७७ धावा केल्या. यशस्वीबरोबर सलामीला २०१ धावांची भागिदारी त्याने रचली. त्यामुळेच पर्थमधील विजय शक्य झाला. तिसऱ्या ब्रिस्बेन कसोटीतही त्याने ८४ धावा केल्या. एकूण १० डावांत त्याने ३० च्या सरासरीने २७६ धावा केल्या. राहुलला नेमकं कुठल्या क्रमांकावर खेळवायचं याचा संघ प्रशासनाच्या मनातच घोळ होता. आणि त्याचा परिणाम राहुलच्या नंतरच्या कामगिरीवर झाला. पण, सलामीला राहुलची कामगिरी चांगली होती.
मार्नस लाबुशेन – मधल्या फळीवर ऑस्ट्रेलियाचंच वर्चस्व होतं. लाबुशेनने मालिकेत ७२, ७० आणि ६२ अशा धावा तीन डावांमध्ये केल्या. संपूर्ण मालिकेत तो फॉर्ममध्ये नव्हता. आणि १० डावांमध्ये २५ च्या सरासरीने त्याने फक्त २३२ धावा केल्या. पण, एकूणच मालिकेवर गोलंदाजांचं वर्चस्व असताना, तिसऱ्या क्रमांकावर लबुशेनचीच कामगिरी सातत्यपूर्ण होती.
स्टिव्ह स्मिथ – स्मिथने पुन्हा एकदा आपण का महत्त्वाचे आहोत ते दाखवून दिलं. एकदा सूर गवसल्यावर लागोपाठ दोन शतकं झळकावत त्याने मालिकेत ३१४ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या ९,९९९ धावा झाल्या आहेत. आणि सध्याचा तो एक दिग्गज खेळाडू आहे. तौ लौकिक या मालिकेतही त्याने दाखवून दिला.
ट्रॅव्हिस हेड – भारताविरुद्ध पुन्हा एकदा ट्रॅव्हिस हेडची बॅट तळपली. ५ सामन्यांत त्याने एकूण ४४८ धावा केल्या. आणि त्याचा स्ट्राईकरेट ९२ धावांचा होता. इतर ऑस्ट्रेलियन फलंदाज धावा करत नसताना पर्थपासून हेड फॉर्मात होता. आणि बुमराला कशी फलंदाजी करायची हे त्यानेच इतरांना दाखवून दिलं.
(हेही वाचा – Bangladesh Muslim Citizen ला रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीतून दिला बोगस जन्म दाखला)
ऋषभ पंत (यष्टीरक्षक) – ऋषभ पंत (Rishabh Pant) खराब फटके खेळून काही वेळा बाद झाला. पण, संघासाठी ४ डावांमध्ये त्याने २५५ धावा केल्या. त्याची सरासरी २८ धावांची फारशी प्रभावी नसली तरी सिडनीतील अर्धशतक असो किंवा ब्रिस्बेनमध्ये त्याने केलेला प्रतिकार असो, ऋषभने (Rishabh Pant) किल्ला लढवण्याचं काम इमाने इतबारे केलं.
नितिश कुमार रेड्डी (अष्टपैलू) – अष्टपैलू खेळाडू म्हणून नितिशने आपल्या कामगिरीने जागा पक्की केली आहे. ही त्याची पदार्पणाची मालिका होती. आणि त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत मालिकेत १० डावांमध्ये २९८ धावा आणि ५ बळी मिळवले. मेलबर्नमध्ये पहिल्या डावात त्याने ११४ धावांची सुरेख खेळीही साकारली. २१ वर्षीय नितिशने कठीण परिस्थितीत धैर्याने फलंदाजी केली.
नॅथन लायन (फिरकीपटू) – ही मालिका मूळातच तेज गोलंदाजांनी गाजवली. पण, संघात एका फिरकीपटूला जागा असेल तर ती नॅथन लायनला द्यावी लागेल. ३६ धावांच्या सरासरीने त्याने ९ बळी मिळवले. पण, जाडेजा, अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यापेक्षा तो नक्कीच प्रभावी होता.
(हेही वाचा – Santosh Deshmukh Murder : देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यात जातीयद्वेष पसरवण्याचा प्रयत्न)
जसप्रीत बुमराह (तेज गोलंदाज) – भारताचा पराभव झाला असला तरी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) निर्विवाद सर्वोत्तम तेज गोलंदाज होता. मालिकेत त्याने ५ कसोटींत मिळून ३२ बळी मिळवले. आणि त्याला कसं खेळायचं हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना शेवटपर्यंत कळलं नाही. ऑस्ट्रेलियातील तो सगळ्यात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे. आणि या वर्षी सर्वात जास्त कसोटी बळी मिळवणारा गोलंदाजही बुमराच (Jasprit Bumrah) आहे.
पॅट कमिन्स (तेज गोलंदाज) – ऑस्ट्रेलियन कर्णधाराकडे या संघाचंही नेतृत्व जातं. मालिकेत नेतृत्वाबरोबरच त्याने २५ बळीही मिळवले. आणि संघाला गरज असताना धावाही केल्या.
स्कॉट बोलंड (तेज गोलंदाज) – स्कॉट बोलंड खरंतर ऑस्ट्रेलियाचा चौथा पर्याय होता. हेझलवूड जायबंदी झाल्यावर त्याला संघात स्थान मिळालं. पण, त्यानंतर त्याने कमाल केली. १३ च्या सरासरीने ३ सामन्यांत त्याने २१ बळी मिळवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community