भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळ अजून व्हायचाय; Gautam Gambhir यांचे महत्त्वाचे विधान

रोहितच्या निवृत्तीची चर्चाही गंभीरने झिडकारली.

43
भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळ अजून व्हायचाय; Gautam Gambhir यांचे महत्त्वाचे विधान
भारतीय संघाचा सर्वोत्तम खेळ अजून व्हायचाय; Gautam Gambhir यांचे महत्त्वाचे विधान
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाचे (Champions Trophy) तीनही साखळी सामना वर्चस्व गाजवत जिंकले. उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचाही निर्विवाद पराभव केला. असं असलं तरी संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाच्या कामगिरीने पूर्णपणे समाधानी नाही. संघाचा परीपूर्ण खेळ अजून व्हायचा आहे. आणि तो रविवारी बघायला मिळेल, असंही गंभीरने (Gautam Gambhir) बोलून दाखवलं आहे. ‘असं बघा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला कामगिरीत सतत सुधारणा करण्याची आस असते. तुम्ही सगळ्याच गोष्टी ठरल्याप्रमाणे करत नसता. पण, त्या तशा व्हाव्यात यासाठी तयारी करत राहणं तुमच्या हातात आहे. मी लवकर संतुष्ट होणाऱ्यांपैकी नाही,’ असं गंभीर (Gautam Gambhir) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला.

मैदानावर राजासारखं राहायचं आणि मैदानाबाहेर गुलामासारखं राबायचं, असा मंत्र गंभीर यांनी संघाला दिला आहे. ‘मैदानावर आम्हाला अगदी निर्ढावलेलं आक्रमक क्रिकेट खेळायचंय. प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखणार नाही. पण, त्यांना चारी मुंड्या चित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पण, मैदानाबाहेर आम्ही लीन असू हे ही आम्ही बघू,’ असं गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला.

(हेही वाचा – ठाण्यात उभारणार कन्व्हेंक्शन सेंटर; खासदार Shrikant Shinde यांची माहिती)

भारतीय संघाने फलंदाजांची क्रमवारी आणि गोलंदाजीतही काही विचित्र बदल केले आहेत. के एल राहुल (KL Rahul) या तज्ज फलंदाजाला अक्षर पटेलच्या (Akshar Patel) नंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवलं जात आहे. तर संघात एकाच वेळी चार फिरकीपटूंचा समावेश केला जात आहे. आणि शमी तसंच हार्दिक हे दोनच तेज गोलंदाज संघात आहेत. पण, हीच संघाची वेळेच्या गरजेनुसार आखलेली रणनीती आहे, असं गंभीरला (Gautam Gambhir) वाटतं.

‘तुम्ही नियमित गोष्टींना फाटा दिलात तर काहीतरी नवीन करू शकाल. आम्ही इथं तेच करतोय. क्रिकेट हा खेळ त्यासाठीच आहे. इथं साचेबद्ध वागण्यापेक्षा नवीन प्रयोग करून बघितले पाहिजेत. भारतीय क्रिकेटसाठी जे आवश्यक आहे ते बदल आम्ही करू. ड्रेसिंग रुममध्ये सगळ्यांची या गोष्टीला मान्यता आहे,’ गंभीरने (Gautam Gambhir) रणनीती आणखी स्पष्ट करताना सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या सामन्यानंतर स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पण, गंभीरने (Gautam Gambhir) अशी शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. तो रोहितच्या बाजूने उभा राहिला आहे. ‘तुम्ही काही सामन्यांती आकडेवारी बघत असाल. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये सामन्यातील खेळाडूचा प्रभाव आणि उपयुक्तता पाहतो. त्यामुळे रोहित (Rohit Sharma) अजूनही भारतीय संघाला हवा हवासा असलेला खेळाडू आहे,’ असं गंभीरने (Gautam Gambhir) ठणकावून सांगितलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.