आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीच्या घाटात शुक्रवारी, ११ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. तसेच मावळ तालुक्यातील नाणोलीमध्ये बैलगाडा शर्यत शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. या बैलगाडा शर्यतींमुळे बैलगाडा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 354 बैलगाडा मालक सहभागी होणार आहेत .
आंबेगाव येथे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैल गाडा शर्यत सुरु आहे. मावळामध्ये भरणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मावळमधील चाकण तर्फ नाणोली मधील बैलगाडा शर्यतीत
खालील प्रकारे बक्षिसे असणार
- प्रथम क्रमांक- प्रथम क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक बारीस एक मोटारसायकल
- द्वितीय क्रमांक-1 लाख 51 हजार रुपये रोख आणि एक अर्धा तोळ्यांची अंगठी
- तृतीय क्रमांक-1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
- चतुर्थ क्रमांक-75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्यांची अंगठी
- घाटाचा राजा -1 एक तोळ्याची अंगठी
(हेही वाचा १० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारात अनिल देशमुखांच्या कुटुंबियांचाही सहभाग?)
शर्यत आकर्षक फायनल सम्राट
- प्रथम क्रमांक-51 हजार रुपये रोख
- द्वितीय क्रमांक-31 हजार रुपये रोख
- तृतीय क्रमांक-21 हजार रुपये रोख