- ऋजुता लुकतुके
आशिया चषकापूर्वी भारतीय संघासाठी ही सरावाची शेवटची संधी आहे. विशेष म्हणजे दुखापतीतून सावरलेले कर्णधार जसप्रीत बुमरा आणि प्रसिध कृष्णा यांच्यासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पुढील कार्यक्रम आधी आशिया चषक आणि पुढे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक असा भरगच्च आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्धची ही टी-२० मालिका भारतीय संघासाठी सामन्यातील सरावाची शेवटची संधी आहे. त्यातच अकरा महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमरासाठी तर तंदुरुस्तीचीही परीक्षा असेल.
त्यामुळे आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्ये भारतीय संघ पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा सगळ्यांचं लक्ष जसप्रीत बुमरावरच असेल. बुमराबरोबरच चेंडूला चांगली उसळी देऊ शकणारा त्याचा साथीदार प्रसिध कृष्णावरही निवड समितीची नजर असेल. आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड रविवारी (२० ऑगस्ट) होईल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे पहिली टी-२० ही खेळाडूंसमोरची शेवटची संधी असेल.
जसप्रीत आणि प्रसिध यांच्याबरोबरच भारतीय संघातील फलंदाजांची दुसरी फळी या मालिकेत खेळतेय. त्यामुळे ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, जितेश शर्मा तसंच संजू सॅमसनवरही निवड समितीची नजर असेल. संजू सॅमसनने विंडिज दौऱ्यात आपल्या कामगिरीने निराश केलं आहे. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध त्याला कितपत संधी मिळते हा प्रश्नच आहे. डब्लिनमध्ये पोहोचल्यापासून भारतीय संघाने रोज फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला आहे.
The moment we have all been waiting for. @Jaspritbumrah93 like we have always known him. 🔥🔥 #TeamIndia pic.twitter.com/uyIzm2lcI9
— BCCI (@BCCI) August 16, 2023
या व्हीडिओत जसप्रीत बुमरा पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करताना दिसतो आहे. ही नक्कीच समाधानाची गोष्ट आहे.
सरावाचा आणखी एक व्हिडिओ बीसीसीआयने प्रसिद्ध केला आहे.
Doublin’ the intensity in Dublin ft. #TeamIndia 😎#IREvIND pic.twitter.com/xcOzf2e0oO
— BCCI (@BCCI) August 16, 2023
ही मालिका जिंकण्याबरोबरच आगामी आशिया चषकात स्थान मिळवणं हे भारतीय खेळाडूंसमोरचं आणखी एक आव्हान या मालिकेत असेल. १८ ऑगस्टला मालिकेतील पहिला टी-२० सामना होणार आहे. त्याचं प्रक्षेपण भारतात कुठे होईल आणि सामन्याचं वेळापत्रक जाणून घेऊया…
(हेही वाचा – Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्यभरातात पावसाचा जोर वाढणार)
सामना : भारत वि. आर्यलंड पहिला टी-२० सामना
कुठे : द व्हिलेज, डब्लिन
वेळ : ७.३० संध्याकाळी (भारतीय वेळ)
प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८-१, स्पोर्ट्स १८-१ एचडी, स्पोर्ट्स १८ खेल, जिओ सिनेमा (फक्त भारतात)
संभाव्य भारतीय संघ : जसप्रीत बुमरा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार
राखीव खेळाडू : जितेश शर्मा, शाहबाझ खान, प्रसिध कृष्णा, आवेश खान.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community