- ऋजुता लुकतुके
सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा करंडक सध्या तीन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. ढाक्यातील प्रसिद्ध पद्म पूलाजवळ हा करंडक ठेवण्यात आला आहे. कुठल्याही महत्त्वाच्या जागतिक स्पर्धेची एक परंपरा असते. स्पर्घा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी तिचा मानाचा करंडक सदस्य देशांमध्ये फिरवला जातो. त्यानिमित्ताने चाहत्यांना हा करंडक प्रत्यक्ष पाहता येतो आणि त्याच्याबरोबर फोटोही काढता येतो. अशा कार्यक्रमांना गर्दीही खूप होते.
The iconic Padma Multipurpose Bridge becomes a noteworthy stop on the ICC Cricket World Cup 2023 trophy’s global expedition.
#BCB | #cricket | #iccworldcup2023 pic.twitter.com/Amh4sbXDMB
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 7, 2023
सध्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा करंडकही जग भ्रमंतीवर आहे. जून महिन्यात भारतातूनच सुरू झालेली करंडकाची सफर आता परतीच्या प्रवासात बांगलादेश पर्यंत पोहोचली आहे. बांगलादेशमधील प्रसिद्ध पद्म पूलाजवळ हा करंडक चाहत्यांच्या भेटीसाठी ठेवण्यात आला आहे. आणि चाहते करंडक पाहायला गर्दीही करत आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळाने या करंडकाची स्थापना पद्म पूलाजवळच्या मैदानात केली तेव्हाचे दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत.
The ICC World Cup trophy glows in the Padma Bridge’s light.💥🏆
#BCB | #cricket | #iccworldcup2023 pic.twitter.com/SqCPVTjqJx
— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 7, 2023
२७ जूनपासून विश्वचषक करंडक जगभ्रमंतीला निघाला आहे. १४ जुलैपर्यंत तो भारतातील प्रमुख शहरांमध्ये फिरला. त्यानंतर कुवेत, बहारिन, अमेरिका, युगांडा, मलेशिया, नायजेरिया आणि फ्रान्स या क्रिकेट न खेळणाऱ्या देशांमध्येही तो फिरला आहे. आयसीसी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करत असल्यामुळे संघटनेचे सदस्य असलेल्या देशात आणि क्रिकेटला जनमान्यता असलेल्या देशात स्पर्धेचा करंडक फिरवण्याचा प्रघात आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान भारतात रंगणार आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भरणार आहे.
(हेही वाचा – Hardik Pandya : टी-२० सामना गमावला. पण, हार्दिकने जसप्रीत बुमरा आणि अश्विनला टाकलं मागे)
आयसीसी विश्वचषक करंडकाचा प्रवास –
२७ जून ते १४ जुलै – भारत
१५-१६ जुलै – न्यूझीलंड
१७-१८ जुलै – ऑस्ट्रेलिया
१९-२१ जुलै – पापुआ न्यू जिनी
२२-२४ जुलै – भारत
२५ – २७ जुलै – अमेरिका
२८ – ३० वेस्ट इंडिज
३१ जुलै – ४ ऑगस्ट – पाकिस्तान
५ – ६ ऑगस्ट – श्रीलंका
७ – ९ ऑगस्ट – बांगलादेश
१० – ११ ऑगस्ट – कुवेत
१२ – १३ ऑगस्ट – बहारिन
१४ – १५ ऑगस्ट – भारत
१६ – १८ ऑगस्ट – इटली
१९ – २० ऑगस्ट – फ्रान्स
२१ – २४ ऑगस्ट – इंग्लंड
२५ – २६ ऑगस्ट – मलेशिया
२७ – २८ ऑगस्ट – युगांडा
२९ – ३० ऑगस्ट – नायजेरिया
३१ ऑगस्ट – ३ सप्टेंबर – द आफ्रिका
४ सप्टेंबरपासून भारत
हेही पहा –
Join Our WhatsApp Community