Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटता सुटेना, पाकच्या अटी भारताला अमान्य

पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला मान्यता देताना दोन अटी ठेवल्या आहेत.

71
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटता सुटेना, पाकच्या अटी भारताला अमान्य
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाचा तिढा सुटता सुटेना, पाकच्या अटी भारताला अमान्य
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला मान्यता दिल्यामुळे चॅम्पियन्स करंडकाची (Champions Trophy 2025) अनिश्चितता संपली आहे असं वाटत असतानाच नवीन समस्या उभी राहिली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने हायब्रीड मॉडेल मान्य करताना दोन अटी ठेवल्या. यातील एक अट आहे ती पाकिस्तानला आयसीसीकडून अतिरिक्त आर्थिक वाटा मिळावा आणि दुसरी अट म्हणून पाकिस्तानने आपला संघ भारतात न पाठवण्याची भूमिका जाहीर केली आहे. आणि नेमकी हीच अट बीसीसीआयला अमान्य आहे. पुढील ५ वर्षांत भारतात तीन महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धा होणार आहेत. यातील २०२९ चा चॅम्पियन्स करंडक ही स्पर्धा पूर्णपणे भारतात होणार आहे. आणि तिथे हायब्रीड मॉडेलची पाकिस्तानची मागणी बीसीसीआयने (BCCI) धुडकावून लावली आहे. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाचं (Champions Trophy 2025)  अजूनही भिजत घोंगडं आहे.

द टेलिग्राफने याविषयी बातमी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार, बीसीसीआयने (BCCI) आयसीसीला थेट संदेश दिला आहे. ‘भारतात पाकिस्तानप्रमाणे सुरक्षेचा प्रश्न नाही. त्यामुळे पाकिस्तानने समोर ठेवलेला प्रस्ताव स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं भारताने आयसीसीला कळवल्याचं टेलिग्राफने म्हटलं आहे.

(हेही वाचा – Maharashtra CM Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार? वाचा संपूर्ण वेळापत्रक)

मागचे दोन महिने चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy 2025)  प्रश्न अनिर्णित आहे. मागच्या शुक्रवारी आयसीसीने सदस्यांची ऑनलाईन बैठक घेतली. पण, ती १५ मिनिटांत संपली. कारण, पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल थेट नाकारलं. त्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी हे मॉडेल मान्य केलं. पण, त्यासाठी दोन अटी समोर ठेवल्या. या अटी आता बीसीसीआयने धुडकावून लावल्या आहेत.

‘आयसीसी चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy 2025)  प्रश्न कसा सोडवायचा यावर विचार करत आहे. आणि येत्या काही दिवसांत संबंधित क्रिकेट मंडळांच्या बैठका बोलावून हा प्रश्न सोडवण्याचा आयसीसीचा विचार आहे,’ असं टेलिग्राफच्या अहवालात म्हटलं आहे. दुसरीकडे, आता आयसीसीचे अध्यक्ष म्हणून जय शाह (Jay Shah) यांनी कारभार हातात घेतला आहे. त्यामुळे त्यांनाच चॅम्पियन्स करंडकाचा प्रश्न परस्पर सहमतीने सोडवावा लागणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.